आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनी अल्ट्राटेक सिमेंटची घोषणा: आर्थिक वर्ष २४ मध्‍ये १०० दशलक्ष घनमीटरहून अधिक जलसंवर्धन संपादित केले

अल्‍ट्राटेककडून आर्थिक वर्ष २४ साठी आपल्‍या शाश्‍वततेप्रती कटिबद्धतांमधील प्रगतीची घोषणा

    05-Jun-2024
Total Views |

Ultratech cement
 
 
मुंबई: अल्‍ट्राटेक सिमेंट लिमिटेड या भारतातील सिमेंट व रेडी-मिक्‍स कॉंक्रीट (आरएमसी) कंपनीने आज घोषणा केली की कंपनीने आर्थिक वर्ष २४ मध्‍ये १०५ दशलक्ष घनमीटर जल संवर्धन केले आहे, ज्‍यामुळे कंपनी आपल्‍या नियोजित महत्त्वाकांक्षेशी बांधील राहत ५ पट जल सकारात्‍मक बनली आहे.
 
अल्‍ट्राटेकच्‍या जल व्‍यवस्‍थापन प्रयत्नांमध्‍ये युनिट परिसरांचा, तसेच कंपनी कार्यरत असलेल्‍या समुदायांमधील बाहेरील क्षेत्रांचा समावेश आहे. संवर्धन करण्‍यात आलेल्‍या १०५ दशलक्ष घनमीटर पाण्‍यामध्‍ये युनिट परिसरांमधील आणि समुदाय हस्‍तक्षेपांच्‍या माध्‍यमातून पुनर्वापर, पुनर्चक्रण, पुनर्भरण आणि साठवणूक केलेल्‍या पाण्‍याचा समावेश आहे. आर्थिक वर्ष २३ मध्‍ये संवर्धन करण्‍यात आलेल्‍या पाण्‍याच्‍या तुलनेत २० दशलक्ष मीटरहून अधिक वाढ झाली आहे.
 
अल्‍ट्राटेकचे जलसंवर्धन उपक्रम सामायिक संसाधन म्‍हणून पाण्‍याच्‍या महत्त्वावरील त्‍यांच्‍या विश्‍वासावर अवलंबून आहेत, जे व्‍यवसाय कार्यसंचालनासाठी, तसेच समुदायाच्‍या कल्‍याणसाठी आणि जैवविविधतेला संपन्‍न करण्‍यासाठी आवश्यक आहे.अल्‍ट्रा टेकने आपल्‍या साइट ठिकाणी सक्रियपणे रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्‍टम्‍स स्‍थापित केल्‍या आहेत. तसेच अल्‍ट्राटेकने युनिट्स मध्‍ये १०० टक्‍के प्रक्रिया केलेल्‍या पाण्‍याचा पुनर्वापर करण्‍यासाठी आपल्‍या विविध उत्‍पादन युनिट्समध्‍ये झीरो लिक्विड डिस्‍चार्ज (झेडएलडी) प्‍लांट्स देखील स्‍थापित केले आहेत.
 
आपले पाणलोट व्‍यवस्‍थापन दृष्टिकोन आणि समुदाय-केंद्रित उपक्रमांच्‍या माध्‍यमातून अल्‍ट्राटेक जलसंवर्धनावर लक्ष केंद्रित करते, तसेच व्‍यक्‍तींचे जीवन व उदरनिर्वाह देखील संपन्‍न करत आहे. अल्‍ट्राटेकच्‍या पाणलोट व्‍यवस्‍थापन प्रकल्‍पांमध्‍ये संबंधित क्षेत्रातील पर्जन्‍यमानानुसार सर्वांगीण नियोजनाचा समावेश आहे आणि इतर जल संवर्धन उपक्रमांव्‍यतिरिक्‍त पावसाचे पाणी अधि क प्रमाणात साठवण्‍याचे लक्ष्‍य आहे.अल्‍ट्राटेकचे पाणलोट प्रकल्‍प चार मुख्‍य उद्दीष्‍टे संपादित करण्‍यावर लक्ष केंद्रित करतात.
•शाश्‍वत वापर व संवर्धनासाठी नैसर्गिक संसाधनांचे प्रभावी व्‍यवस्‍थापन
 
• प्रगत कृषीपद्धतींच्‍या अंमलबजावणीच्‍या माध्‍यमातून कृषी उत्‍पादकतेमध्‍ये वाढ
 
•स्‍थानिक व्‍यक्‍तींकरिता आर्थिक संधी निर्माण करण्‍यासाठी उदरनिर्वाह उपक्रमांना चालना
 
• समुदाय-आधारित संस्‍था स्‍थापित करत महिलांचे सक्षमीकरण, त्‍यांचा सक्रिय सहभाग आणि निर्णय घेण्‍याच्‍या क्षमतेला सक्षम करणे
 
आपल्‍या सामुदायिक पाणलोट प्रकल्‍पांच्‍या माध्‍यमातून अल्‍ट्राटेकने आतापर्यंत १९१ चेक डॅम आणि ९७ रेन वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर्स, सोक पिट्स आणि मोठे तलाव बांधले आहेत. अल्ट्राटेकच्या सामुदायिक जलसंधारण उपक्रमांचा ३५,२१८ हून अधिक शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. जलस्रोतांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी अल्ट्राटेकच्‍या प्रयत्‍नांमधून शाश्‍वत भविष्‍य घडवण्‍याप्रती त्‍यांची कटिबद्धता दिसून येते.
 
आर्थिक वर्ष २४ मधील शाश्‍वतता प्रगती
 
अल्‍ट्राटेकने आपल्‍या मूल्‍यसाखळीमध्‍ये शाश्‍वततेचा समावेश करण्‍यासाठी सर्वांगीण दृष्टिकोन अवलंबला आहे. कंपनीने आपल्‍या व्‍यवसाय आचारणामध्‍ये लो-कार्बन धोरणाचा समावेश केला आहे. कंपनी पर्यावरणास अनुकूल उत्‍पादनांच्‍या विकासामध्‍ये गुंतवणूक वाढवत आहे, ऊर्जा कार्यक्षमता सुधारत आहे, नवीकरणीय ऊर्जेचे प्रमाण वाढवत आहे, जैवविविधता संपन्‍न करण्‍यासाठी हरित आच्‍छादन वाढवत आहे आणि चक्रियतेला चालना देण्‍यासाठी आपल्‍या उत्‍पादन कार्यसंचालनांमध्‍ये औद्योगिक व नगरपालिका कचऱ्याचा पुनर्वापर वाढवत आहे.
 
आर्थिक वर्ष २४ दरम्‍यान अल्‍ट्राटेकने शाश्‍वततेच्‍या प्रमुख फोकस क्षेत्रांमध्‍ये मोठी प्रगती केली आहे, ही क्षेत्रे आहेत डिकार्बनायझेशन, ऊर्जा परिवर्तन, चक्रिय अर्थव्‍यवस्‍था, जैवविविधता व्‍यवस्‍थापन, जल संवर्धन, सुरक्षित कार्यसंचालन आणि समुदाय विकासाशी निगडित आहेत.

डिकार्बनायझेशन:
 
अल्‍ट्राटेकचे निव्‍वळ कार्बन डायऑक्‍साइड उत्‍सर्जन प्रमाण २०१७ मधील प्रतिटन ६३२ किग्रॅ सिमेंटियस उत्‍पादनांच्‍या तुलनेत आर्थिक वर्ष २४ मध्‍ये प्रतिटन ५५६ किग्रॅ सिमेंटियस उत्‍पादनांपर्यंत कमी झाले आहे, जे २०३२ पर्यंत कार्बन तीव्रतेमध्‍ये २७ टक्‍के घट करण्‍याच्‍या कंपनीच्‍या लक्ष्‍याशी बांधील आहे.
 
कंपनीने आपल्‍या क्षमता विस्‍तारीकरण प्रकल्‍पांचा भाग म्‍हणून औष्मिक ऊर्जा क्षमतेमध्‍ये अधिक गुंतवणूक न करण्‍याचा आपला हेतू व्‍यक्‍त केला आहे, ज्‍यामुळे जीवाश्‍म इंधनावरील कंपनीचे अवलंबत्‍व कमी होईल आणि कंपनीच्‍या कार्यसंचालनांमध्‍ये हरित ऊर्जेचा वापर वाढेल.

ऊर्जा परिवर्तन:
 
अल्‍ट्राटेकने मूळ वर्ष २०१० पासून आपली ऊर्जा उत्‍पादकता यशस्‍वीरित्‍या दुप्‍पट करत लक्ष्‍य वर्ष २०३५ अगोदर आपली ईपी१०० कटिबद्धता पूर्ण केली आहे.
 
आपल्‍या आरई१०० कटिबद्धतेचा भाग म्‍हणून अल्‍ट्राटेकने आर्थिक वर्ष २३ मधील क्षमतेच्‍या तुलनेत आपली नवीकरणीय ऊर्जा क्षमता ७७ टक्‍क्‍यांनी आणि डब्‍ल्‍यूएचआरएस क्षमता ३२ टक्‍क्‍यांनी वाढवली आहे. आर्थिक वर्ष २४ मध्‍ये विद्यमान क्षमता ६१२ मेगावॅट आरई आणि २७८ मेगावॅट डब्‍ल्‍यूएचआरएस आहे. अल्‍ट्राटेकने आर्थिक वर्ष २४ मध्‍ये ग्रीन पॉवर मिक्‍सच्‍या माध्‍यमातून २३.६ टक्‍के वीज प्रतिस्‍थापन संपादित केले आहे. अल्‍ट्राटेकची आपल्‍या एकूण ऊर्जा मिश्रणामधील हरित ऊर्जेचे एकूण प्रमाण २०३० पर्यंत ८५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढवण्‍याची योजना आहे.
 
चक्रिय अर्थव्‍यवस्‍था:
 
अल्‍ट्राटेकने चक्रिय अर्थव्‍यवस्‍था वाढवण्‍यासह नैसर्गिक संसाधनांचा वापर कमी करण्‍याप्रती आपल्‍या कटिबद्धतेचा भाग म्‍हणून आपल्‍या सिमेंट उत्‍पादन कार्यसंचालनांमध्‍ये पर्यायी इंधन व कच्‍चा मालांचा (एएफआर) वापर वाढवला आहे.
 
अल्‍ट्राटेकने आर्थिक वर्ष २४ मध्‍ये सिमेंट उत्‍पादनात ३३ दशलक्ष टनहून अधिक रिसायकल केलेल्‍या व पर्यायी कच्‍चा मालांचा यशस्‍वीपणे वापर केला आहे. याव्‍यतिरिक्‍त, कंपनीने आर्थिक वर्ष २४ मध्‍ये १.५ दशलक्ष टनहून अधिक पर्यायी इंधनांचा वापर केला.अल्‍ट्राटेकच्‍या प्रयत्‍नांनी कंपनीला आर्थिक वर्ष २४ मध्‍ये ३.२६ पट प्‍लास्टिक निगेटिव्‍ह बनण्‍यास मदत केली आहे.
 
जैवविविधता:
 
अल्‍ट्राटेक जैवविविधतेप्रती ‘नो नेट लॉस' संपादित करण्‍यासाठी कटिबद्ध आहे. अल्‍ट्राटेकने आपल्‍या १४ एकीकृत युनिट्ससाठी जैवविविधता मूल्‍यांकन पूर्ण केले आहेत आणि डिसेंबर २०२४ पर्यंत आपल्‍या सर्व युनिट्सकरिता हे मूल्‍यांकन पूर्ण करण्‍याची कंपनीची योजना आहे.
 
अल्‍ट्राटेकने आपल्‍या उत्‍पादन ठिकाणी हरित आच्‍छादन वाढवण्‍यासाठी मियावाकी वनीकरण पद्धतींचा अवलंब केला आहे. या पद्धतीचा उपयोग करत कंपनीच्‍या पाच युनिट्समध्‍ये ३४,००० हून अधिक झाडे लावण्‍यात आली आहेत.
 
स्थानिक गावकऱ्यांना चारा, इंधन, फळे आणि फुले यांचा पुरवठा करण्‍यासोबत जंगलातील कार्बनचे प्रमाण कमी करण्‍याची क्षमता वाढवण्यासाठी आणि जैवविविधता व वन्यजीवांकरिता पुन्हा अधिवास निर्माण करण्याच्या दृष्टीने आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी वनस्पतींच्या अनेक प्रजातींची निवड करण्यात आली आहे.