शेअर बाजार अपडेट: बाजारात वापसी ! १३७४.८९ अंशाने सेन्सेक्स वाढला !

मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये वाढ तर पीएसयु बँक समभागात घसरण

    05-Jun-2024
Total Views |

Stock Market
 
 
मुंबई: आज सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात तुलनेने मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. स्वतःच्या बळावर बहु मताचा आकडा भाजपाला गाठता आला नसला तरी एनडीए प्रणित सरकार स्थापन करून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होतील अशीच शक्यता निर्माण झाल्याने पुन्हा सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकात वाढ झाली आहे. सेन्सेक्स तब्बल १.९१ टक्क्यांनी म्हणजेच १३७४.८९ अंशाने वाढत ७३४५३.९४ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी निर्देशांक ४३५.८५ म्हणजेच १.९९ टक्क्यांनी वाढत २२३२०.३५ पातळीवर वाढ झाली आहे.
 
बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे २.७२ व १.४७ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर एनएसईत मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.७८ व १.७८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक १.९१ टक्क्यांनी म्हणजेच ८२३.१८ अंशाने वाढत ५४४००.२६ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक १.८१ टक्क्यांनी वाढत म्हणजेच ८५०.०० अंशाने वाढत ४७७७८.६० पातळीवर पोहोचला आहे.
 
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात पीएसयु बँक (०.५०%) समभाग वगळता इतर समभागात वाढ झाली आहे. विशेषतः सर्वाधिक वाढ एफएमसीजी (५.२६%), ऑटो (३.६०%), मिडिया (२.९८%), प्रायव्हेट बँक (२.१३%) समभागात वाढ झाली आहे.
 
बीएसईत एचयुएल, एम अँड एम, एशियन पेंटस, कोटक महिंद्रा, आयटीसी, नेस्ले, एचसीएलटेक, मारूती सुझुकी, विप्रो, टाटा स्टील, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, सनफार्मा,टायटन कंपनी, एचडीएफसी बँक,टेक महिंद्रा, टाटा मोटर्स, बजाज फिनसर्व्ह, टीसीएस, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक,एक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट या समभागात वाढ झाली आहे तर लार्सन,पॉवर ग्रीड, एसबीआय, भारती एअरटेल या समभागात घसरण झाली आहे.
 
एनएसईत एचयुएल, ब्रिटानिया, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, एशियन पेंटस, नेस्ले, आयटीसी, एचसीएलटेक,एम अँड एम, बजाज ऑटो, सनफार्मा, सिप्ला,आयशर मोटर्स, कोटक महिंद्रा, डॉ रेड्डीज, इन्फोसिस, एचडीएफसी लाईफ, एसबीआय लाईफ इन्शुरन्स,टेक महिंद्रा, टायटन कंपनी, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स , रिलायन्स, एचडीएफसी बँक या समभागात वाढ झाली आहे तर लार्सन, बीपीसीएल, ग्रासीम, पॉवर ग्रीड या समभागात घसरण झाली आहे.