शेअर बाजार विश्लेषण: बाजारात ' स्मार्ट ' रिकव्हरी सेन्सेक्समध्ये २१६६.६६ व निफ्टी ७३५.८५ अंशाने रॅली

मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये वाढ कायम ! मेटल, एफएमसीजीसह अखेरीस पीएसयु समभागात वाढ

    05-Jun-2024
Total Views |

Stock Market
 
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात 'स्मार्ट' रिकव्हरी झाली आहे. आज मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचे अनौपचारिक रित्या स्पष्ट झाल्याने बाजारात प्रचंड मोठी रॅली झाली आहे. संपूर्ण एक महिन्यात अस्थिरतेचे प्रतिक म्हणून समजल्या जाणाऱ्या वीआयएक्स (VIX) निर्देशांकात चढउतार झाली असताना आजही त्याचीच पुनरावृत्ती झाली असं म्हणता येईल.
 
सेन्सेक्स निर्देशांक २३०३.१९ अंशाने वाढत ७४३८२.२४ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी निर्देशांक ६९५.५० अंशाने वाढत २२५८०.०० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स व निफ्टी या दोन्ही निर्देशांकात अखेरच्या सत्रात ३.२० व ३.१८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच सेन्सेक्स बँक निर्देशांक २२११.०८ अंशाने वाढ होत ५५७८८.१६ पातळीवर निर्देशांक पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक २१२६.०० अंशाने वाढ होत ४९०५४.६० पातळीवर निर्देशांक पोहोचला आहे.
 
(Sectoral Indices) निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सगळ्याच समभागात वाढ झाली आहे. काल क्षेत्रीय निर्देशांकात बहुतांश समभागात घसरण झाली होती. त्यांची कसर आज भरून काढली गेली आहे.अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ मेटल (५.७५%), फार्मा (३.६५%), पीएसयु बँक (२.८८%), फायनांशियल सर्विसेस २५/५० (४.२४%), मिडिया (३.९६%) ऑटो (४.७०%) समभागात झाली आहे.
 
बीएसईत (BSE) आज एकूण ३९१८ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील २५९७ समभागात वाढ झाली आहे तर १२२४ समभागात घसरण झाली आहे. त्यातील ११७ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर ११० समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. २०० समभाग अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ३३७ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.
 
एनएसईत (NSE) एकूण २७७१ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १९५६ समभागात वाढ झाली आहे तर ७२१ समभागात घसरण झाली आहे. ६९ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर ८९ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. ७४ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर २६७ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.
 
आज बीएसईतील कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ४०७.७९ लाख कोटींवर पोहोचले आहे तर एन एसईतील कंपन्यांचे बाजार भांडवल ३९१.५८ लाख कोटींवर पोहोचले आहे. आज भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत वधारला आहे.विशेषतः युएस बाजारातील लेबर मार्केटमध्ये येणारे आकडेवारी निराशाजनक असल्याने डॉलर निर्देशांकात घसरण झाली आहे. परिणामी शेवटी भारतीय डॉलर रूपयांच्या तुलनेत ८३.४२ रुपयांवर स्थिरावला होता.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या दरात घसरण झाली होती. अमेरिकन बाजारातील लेबर मार्केटमध्ये असमाधानकारक आकडेवारी आल्यानंतर डॉलरच्या घसरण झाली होती. तसेच अमेरिकेतील रोजगाराच्या संधीतील आकडेवारीत देखील घसरण झाल्याने हे तीन वर्षातील सर्वाधिक कमी आकडे असल्याचे सांगितले जात आहे. युएस अर्थव्यवस्थतेतील शिथीलता आल्याने सोनाच्या निर्देशांकातही प्रभाव पडला होता. परिणामी सोने स्वस्त झाले होते.
 
संध्याकाळपर्यंत युएस गोल्ड स्पॉट निर्देशांकात ०.२१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.१७ टक्क्यांनी वाढ झाली होती. भारतातील एमसीएक्स सोने निर्देशांकात ०.२० टक्क्यांनी घसरण होत सोने पातळी ७१८५२.०० पातळीवर पोहोचले आहे. एमसीएक्सवरील चांदी निर्देशांकात ०.२५ टक्क्यांनी घसरण झाली होती.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाच्या (Crude Oil) निर्देशांकात वाढ झाली आहे. ओपेक राष्ट्रांच्या बैठकीत तेलाच्या उत्पादनात कपातीचा निर्णय घेतला गेला होता. मात्र ओपेक राष्ट्रांच्या निर्णयाला तेल किमतींचे आव्हान मिळाल्यामुळे बाजारात काही प्रमाणात किमतीत दिलासा मिळाला होता. आज तुलनेने मागणीत वाढ झाल्याने बाजारातील कच्च्या तेलाच्या निर्देशांकात वाढ झाली आहे.WTI Future क्रूड निर्देशांकात ०.२० टक्क्यांनी वाढ झाली आहे तर Brent क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.१८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एमसीएक्सवरील निर्देशांकात ०.५८ टक्क्यांनी घसरण झाल्याने तेलाचे दर ६१३१.०० रुपये प्रति बॅरेलवर पोहोचले आहेत.
 
गेल्या महिनाभरात वीआयएक्सने मोठी भूमिका शेअर बाजारात पार पडली आहे. बाजारात मंदी असताना 'अंडरकरंट' कायम असल्याचे पाहत बाजारात ' नफा बुकिंग ' झाले तर काही वेळा शेअर बाजारात नवा उच्चांक गाठला गेला. काल भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्याने बाजारात ५००० अंशापर्यंत घसरण झाली होती परिणामी सगळ्याच समभागात घसरण झाली होती. आज मात्र पुन्हा मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याने बाजाराने पुन्हा एकदा झेप घेतली आहे.
 
अमेरिकन बाजारातील महागाई दर स्थिर आल्यानंतर पीसीई (Personal Consumption Expenditure) जोल्ट (The Job Openings and Labor Turnover Survey) यामध्ये अपेक्षित आकडेवारी न आल्याने अमेरिकन बाजारातील पुढील पावले तेजीची दिसत नाही. या पार्श्वभूमीवर आशियाई बाजारातील धोरणाकडे, चीन अर्थव्यवस्था, व भारतीय निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता एनडीए सरकार येणार असल्याने आगामी काळात बाजार कसा प्रतिसाद देतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भारतातील एचएसबीसी सर्विस परचेसिंग मॅनेजर निर्देशांकात देखील सेवा क्षेत्रातील मागणी घटल्याने निर्देशांक घटला असला तरी रोजगार निर्मितीत वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत वीआय एक्सची भूमिका काय असावी हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
 
काल शेअर बाजारातील निव्वळ ३३१८.९८ कोटींची गुंतवणूक काढून घेतली गेली होती. आज मात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांनी विश्वास व्यक्त केला असल्याने निर्देशांकात वाढ झाली होती. आज भारतीय वीआयएक्स १८.८८ टक्क्यांवर हालचाल करत होता. अखेरीस मात्र शेअर्समध्ये मोठी वाढ झाली होती.
 
बीएसईत आज इंडसइंड बँक, एम अँड एम, टाटा स्टील, बजाज फायनान्स, एचडीएफसी लाईफ, कोटक महिंद्रा, एक्सिस बँक, एचयुएल, जेएसडब्लू स्टील, कोटक महिंद्रा, एचयुएल, आयसीआयसीआय बँक, सनफार्मा, नेस्ले, आयटीसी, एशियन पेंटस, विप्रो, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, भारती एअरटेल, इन्फोसिस, टायटन कंपनी, टेक महिंद्रा, रिलायन्स, एसबीआय, अल्ट्राटेक सिमेंट,पॉवर ग्रीड, टीसीएस या समभागात वाढ झाली आहे. तर लार्सन समभागात घसरण झाली आहे.
 
एनएसईत अदानी पोर्टस, इंडसइंड बँक, हिंदाल्को, हिरो मोटोकॉर्प, एम अँड एम, अदानी एंटरप्राईज, श्रीराम फायनान्स, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, कोटक महिंद्रा, ओएनजीसी, एक्सिस बँक, एचडीएफसी बँक, एचयुएल, कोल इंडिया, सनफार्मा, बजाज ऑटो, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, एशियन पेंटस, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल ब्रिटानिया, एनटीपीसी, टाटा मोटर्स, बजाज फिनसर्व्ह, मारूती सुझुकी, इन्फोसिस, टायटन कंपनी, टेक महिंद्रा, ग्रासीम, एसबीआय, आयशर मोटर्स, रिलायन्स, अपोलो हॉस्पिटल या समभागात वाढ झाली आहे तर भारती डायनामिक, कोचीन शिपयार्ड, वन ९७ पेटीएम, ब्लू स्टार, अदानी एनर्जी, लिंडे इंडिया समभागात घसरण झाली आहे.
 
आजच्या बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले, 'निवडणूक निकालानंतर आज बीजेपी कडुन परत मोदींच पंतप्रधान पदी असतील व सरकार बनविण्याची घोषणा करण्यात आली व ८ जुन ला शपथविधी असल्याचे समजले. या घोषणेचे स्वागत बाजाराने केले व त्यानंतर बाजारात सुधारणा दिसून आली. परत एकदा सरकारी कंपन्यांत,बॅकात तेजी दिसायला लागली.बाजाराला स्थिर सरकार अपेक्षित असते तसेच विकासाची कामे पुढे सुरू राहणार याची गॅरेंटी हवी असते ती मिळणार आहे.परत एकदा विकासाचा अजेंडा राबवण्यात येईल त्याचा वेग किती राहील हे हळूहळू स्पष्ट होईल. आज तरी मोठी सलामी बाजाराने सरकार ला दिली आहे.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले, 'भारतीय बाजाराने विविध क्षेत्रांमध्ये व्यापक आधारित खरेदीमुळे उत्साही रिकव्हरी दाखवली, कारण राजकीय स्थिरता हमखास दिसत आहे. तथापि, सरकारच्या स्थापनेवर आणि आगामी RBI धोरण बैठकीवर लक्ष राहील. बाजाराला RBI च्या धोरणात कोणत्याही बदलाची अपेक्षा नाही. अन्नधान्याची सततची उच्च चलनवाढ आणि सरकारी खर्चात वाढ होण्याची अपेक्षा, ज्यामुळे FMCG समभागांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी प्रतिक्रिया देताना बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, ' सलग तिसऱ्या वर्षी एनडीएची सत्ता येण्याच्या अपेक्षेने आज बाजारात आशावाद निर्माण झाला आहे. निवडणूक निकालानंतर घसरलेल्या बाजारांमध्ये आघाडी घेतल्यानंतर डाबर इंडिया सारख्या FMCG समभागात ३.८१ % वाढ झाली तर HUL समभागांनी ४.२६ % वाढून २६०२ रुपयांवर झेप घेतली.
 
असमाधानकारक निवडणुकीच्या निकालानंतर बचावात्मक एफएमसीजी इक्विटींवरील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. 'आज, हेरिटेज फूड्स आणि अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटीसह तेलगू देसम पार्टी (टीडीपी) संबंधित कंपन्यांचे शेअर्स अनुक्रमे २०% आणि १२% ने वाढले आहेत. प्रादेशिक पक्षाच्या शानदार विजयानंतर टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बनतील आणि ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) पाठिंबा देऊ शकतील या वृत्तानंतर, एक आक्रमक रॅली काढण्यात आली.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीजचे एव्हिपी टेक्निकल डेरिएटिव एनालिस्ट निरज शर्मा म्हणाले, ' मंगळवारच्या मोठ्या घसरणीनंतर बुधवारी भारतीय इक्विटी मार्केटमध्ये मजबूत रिकव्हरी दिसली. भाजप, त्यांच्या युतीसह, एक स्थिर सरकार स्थापन करेल या आशावादामुळे. शेवटी, निफ्टीने दिवस २२६२० वर सकारात्मक नोटवर स्थिरावला.अस्थिरता इंडेक्स (VIX) जवळजवळ ३०% कमी झाला, १८.८९ स्तरांवर स्थिरावला, निर्देशांकाने १००-दिवसांच्या एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज (१००-DEMA) चा अडथळा पार केला आहे १००-DEMA २२०५० पातळीच्या जवळ आहे जोपर्यंत निर्देशांक २२०५० वर टिकून राहतो तोपर्यंत, २३००० आणि २३३५० हे अल्पावधीत प्रतिकार म्हणून काम करतील.'
 
बँक निफ्टी निर्देशांक सकारात्मक नोटेवर उघडला आणि अस्थिरतेच्या दरम्यान तो तेजीत राहिला, शेवटी 49,055 स्तरांवर सकारात्मक नोटवर स्थिरावला. तांत्रिकदृष्ट्या, निर्देशांकाने 100-DEMA चा अडथळा ओलांडला आहे आणि दैनंदिन प्रमाणात इनसाइडर बार कँडलस्टिक पॅटर्न तयार केला आहे. 100-DEMA 48,500 स्तरांजवळ ठेवले आहे. जोपर्यंत 47,500 पातळीपेक्षा जास्त आहे तोपर्यंत चालू असलेली तेजी 49,700-50,000 पातळीपर्यंत वाढू शकते.
 
बाजारातील परिस्थितीविषयी व्यक्त होताना कोटक सिक्युरिटीजचे हेड इक्विटी रिसर्च श्रीकांत चौहान म्हणाले, 'बुधवारी आशियाई व्यापारात तेलाच्या किमती किंचित घसरल्या, यूएस इन्व्हेंटरीजमध्ये अनपेक्षित मोठ्या वाढीचे संकेत देणाऱ्या उद्योग डेटानंतर चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरले. १.०९ दशलक्ष बॅरल्सच्या अंदाजानुसार कमी होण्याच्या विरूद्ध,यूएस क्रूड ऑइल इन्व्हेंटरी ४.०५२ दशलक्ष बॅरलने वाढली. भारताचा सेवा PMI एप्रिलमध्ये ६०.८ वरून ६०.२ वर आला. आज नंतर, व्यापारी यूएसआयएसएम सर्व्हिस पीएमआय डेटावर लक्ष ठेवतील, जे ५०.५ असण्याची अपेक्षा आहे.उद्या,लक्ष यूएस बेरोजगार दाव्यांच्या डेटाकडे वळेल, अंदाजे २२०K असेल.'
 
रुपयांच्या हालचालींवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले, ' रुपयाने सकारात्मक व्यवहार केला, मजबूत नकारात्मक सत्रानंतर ०.१५ रुपयांनी रिकव्हर होऊन ८३.३९ वर बंद झाला. भांडवली बाजा राच्या नूतनीकरणाच्या आत्मविश्वासामुळे ही ताकद वाढली, सध्याचे सरकार मित्रपक्षांच्या पाठिंब्याने चालू ठेवण्याच्या शक्यते मुळे. निवडणुकीचे निकाल जसे की मोजणीनंतर स्पष्ट, रुपयातील अस्थिरता ८३.२०-८३.६० च्या मर्यादेत कायम राहण्याची अपेक्षा आहे.'
 
बँक निफ्टीवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट रुपक डे म्हणाले, ' बँक निफ्टी निर्देशांकाने त्याच्या 200-दिवसांच्या मूव्हिंग सरासरीवरून तीक्ष्ण पुनर्प्राप्ती पाहिली, ती त्याच्या वाढत्या ट्रेंडलाइन आणि २१-दिवसांच्या EMA वर बंद झाली. हे ४७५०० /वर स्टॉप-लॉससह खरेदी-ऑन-डिप धोरण सूचित करते. तात्काळ समर्थन पातळी आहे ४७७००, तर प्रतिकार ४९५०० वर आहे.'