"राऊतांनी आदित्य ठाकरेंचा राजीनामा मागावा!"

नितेश राणेंचा टोला

    05-Jun-2024
Total Views |
 
Raut & Aditya Thackeray
 
मुंबई : मोदीजींचा राजीनामा मागण्याआधी संजय राऊतांनी आदित्य ठाकरेंचा राजीनामा मागावा, असा टोला भाजप आमदार नितेश राणेंनी राऊतांना लगावला आहे. बुधवारी लोकसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. यावर आता राणेंनी त्यांचा जोरदार समाचार घेतला.
 
नितेश राणे म्हणाले की, "संजय राऊत मोदीजींचा राजीनामा मागत आहेत. परंतू, आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात काय अवस्था झाली ते विचारा. त्यांच्या मतदारसंघात अरविंद सावंतांना फक्त ५ हजारांची लीड दिलेली आहे. त्यामुळे मोदीजींचा राजीनामा मागण्याआधी आदित्य ठाकरेंच्या आमदारकीचा राजीनामा मागा."
 
हे वाचलंत का? -  उबाठाच्या अदृश्य हातांनी आम्हाला निवडणूकीत मदत केली; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट
 
"शिल्लक असलेली उबाठा यापुढे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होते की, खऱ्या अर्थाने पक्ष राहतो हे येणाऱ्या काळात दिसेलच. जेवढी भाजपच्या खासदारांची एकुण संख्या आहे तेवढी संख्या संपूर्ण इंडी आघाडीची आहे. त्यामुळे ते कुठल्या गोष्टीचा आनंद साजरा करत आहात तेच कळत नाही," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "महाविकास आघाडीमध्ये सर्वात मोठं नुकसान उद्धव ठाकरेंचंच आहे. त्यांनी मातोश्री सोडून १० जनपथच्या बाहेर जाऊन वॉचमनची नोकरी करावी. कारण त्यांच्यामुळेच तुमचे ९ खासदार निवडून आले आहेत. मोदीजींच्या नेतृत्वाखाली भाजपचे जवळपास २५० खासदार निवडून येतात. पण ज्या काँग्रेसच्या तुम्ही बाता करता त्यांचे १०० खासदारही निवडून आलेले नाहीत," असा टोलाही राणेंनी लगावला आहे.