देवेंद्रजी राजीनामा देऊ नका, सरकारमध्ये राहून मार्गदर्शन करा!

मंत्री मंगल प्रभात लोढा; लोकसभेतील पराभव ही सर्वांची जबाबदारी

    05-Jun-2024
Total Views |
Mangalprabhat Lodha On Devendra Fadnavis

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर बुधवार, दि. ५ जून रोजी भाजपची बैठक झाली. त्यांनतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना, उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाचे संघटनात्मक काम करण्याची जबाबदारी द्यावी, अशी विनंती त्यांनी वरिष्ठ नेत्यांना केली. मात्र, देवेंद्रजी राजीनामा देऊ नका, सरकारमध्ये राहून मार्गदर्शन करा, अशी मागणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.

लोढा म्हणाले "देवेंद्र फडणवीसजी, लोकसभा निवडणुकीत आपण महाराष्ट्राचे नेतृत्व केले, आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आपला मोठा आधार आहे. सध्याच्या राज्य सरकारमध्ये आपली महत्त्वाची भूमिका आहे. आपल्या नेतृत्वात अनेक निवडणुका जिंकल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतील हा पराजय आपल्या एकट्याची जबाबदारी नसून, आम्हा सर्वांची देखील आहे. माझी आपणास विनंती आहे की आपण राजीनामा देऊ नये. सरकारमध्ये राहून आम्हा सर्वांचे मार्गदर्शन करावे व भाजपा कार्यकर्त्यांचे नेतृत्व करावे", अशी मागणी लोढा यांनी केली आहे.