भारतातील पहिला अर्बन रोप वे ऑगस्ट २०२४मध्ये होणार खुला

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये भारतातील पहिला नागरी रोपवे

    05-Jun-2024
Total Views |

ropway


वाराणसी, दि.५ : वृत्तसंस्था 
उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये भारतातील पहिला नागरी रोपवे ऑगस्ट २०२४ पर्यंत तयार होणार आहे. प्रवासाच्या वेळेत कपात करण्याव्यतिरिक्त हा रोपवे प्रकल्प शहराचे विहंगम दृश्य प्रदान करेल. २४ मार्च २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रोपवेचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. 'प्रवतमाला परियोजना' राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रमांतर्गत हा प्रकल्प हाती घेण्यात आला.

या रोपवेचा पहिला टप्पा ६४५ रुपये खर्चाचा असून तो २०२५पर्यंत पूर्ण होईल असा अंदाज आहे. रोपवे प्रकल्प सार्वजनिक वाहतुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यांच्या अंमलबजावणीमध्ये लक्षणीय प्रगती करत आहे. ३.७ किलोमीटर लांबीचा हा रोपवे पाच महत्त्वाच्या ठिकाणांवरून जाणार आहे. गिरजा घर गोडोलिया चौक, रथयात्रा, काशी विद्यापीठ (भारतमाला मंदिर), वाराणसी रेल्वे स्टेशन आणि वाराणसी कॅन्टोन्मेंट हे मार्ग आहेत.

प्रवास वेळ आणि वैशिष्ट्ये

या प्रकल्पामुळे वाराणसी जंक्शन ते गोडोलिया प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. हा प्रवास केवळ १६ मिनिटात पूर्ण लागतील. या सेवेमध्ये सुमारे १५० गोंडोला असतील, प्रत्येकामध्ये दहा प्रवासी असतील, जास्तीत जास्त ६,००० प्रवासी प्रति तास इतकी या रोपवेची क्षमता असेल. चार स्थानकांपैकी प्रत्येक स्थानकावर, गोंडोला दर दोन ते तीन मिनिटांनी येतील, एक अखंड आणि प्रभावी प्रवास अनुभवाची हमी देण्यात आली आहे.