IPO Update: Sattrix कंपनीचा आयपीओ आजपासून बाजारात प्राईज बँड १२१ रुपये प्रति शेअर

५ ते ७ जून काळात आयपीओ बाजारात दाखल

    05-Jun-2024
Total Views |

IPO
 
 
मुंबई: आजपासून दोन आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात दाखल होत आहेत. Sattrix IPO हा आयपीओ ५ जून ते ७ जून २०२४ पर्यंत बाजारात दाखल होणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार,आयपीओत १८ लाख इक्विटी समभाग (शेअर्स) गुंतवणूकदारांसाठी बाजारात उपलब्ध असणार आहेत. बीएसई एसएमई अंतर्गत हा आयपीओ सूचीबद्ध (Listed) होणार आहे.
 
Sattrix Information Security Limited आयपीओचा प्राईज बँड १२१ रुपये प्रति समभाग निश्चित करण्यात आला आहे. गुंतवणूकीसाठी १००० शेअर्सचा एक गठ्ठा (Lot) उपलब्ध असणार आहे. गुंतवणूकदारांना या आयपीओत कमीत कमी १२१००० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. IsK Advisor Pvt Ltd ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडींग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहेत तर Bigshare Services Pvt Ltd कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहेत. मार्केट मेकर म्हणून Sunflower IPO RHP कंपनी काम पाहिल.
 
कंपनीकडून समभागाचे वाटप जून १० पर्यंत करण्यात येणार आहे तर अपात्र गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा ११ जूनपर्यंत परत मिळू शकतो. १२ जूनला कंपनी सूचीबद्ध होणार आहे. मार्केट मेकर यांच्यासाठी एकूण आयपीओतील ५.११ टक्के वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे. किरकोळ (Retail Investors) गुंतवणूकीसाठी ४७.४४ टक्के वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे.
 
Sattrix Information Security Limited कंपनी २०१३ साली स्थापन झाली होती. ही कंपनी सायबर सिक्युरिटी व तत्सम सेवा सुविधा देते. कंपनीच्या महसूलात ३१ मार्च २०२३ मधील ३७७५.६५ कोटींवरुन घट होत ३०६१.६१ कोटीवर पोहोचले होते. करोत्तर नफ्यात (Profit After Tax) मध्ये ३१ मार्च २२०३ मधील ४००.१२ कोटींच्या तुलनेत घट होत करोत्तर नफा २५०.७१ कोटींवर पोहोचले आहे.
 
कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ८२.२८ कोटींवर पोहोचले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतून मिळवलेल्या निधीचा वापर आस्थापनावरील खर्चासाठी तसेच व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी व वर्किंग कॅपिटल गरजेसाठी, दैनंदिन कामकाजासाठी वापरला जाणार आहे.