IPO Update: आजपासून Magnet Lifecare कंपनीचा आयपीओ दखल ३५ रुपये प्रति समभाग प्राईज बँड निश्चित

५ ते ७ जूनपर्यंत बीएसई एसएमई अंतर्गत बाजारात होणार

    05-Jun-2024
Total Views |

IPO
 
 
मुंबई: आजपासून Magneta Lifecare Limited कंपनीचा आयपीओ आजपासून बाजारात दाखल होत आहे. आज ५ जून ते ७ जूनपर्यंत हा आयपीओ बाजारात राहील. कंपनीच्या माहितीनुसार, २० लाख इक्विटी शेअर्स गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे. बीएसई एसएमई (BSE SME) अंतर्गत ही कंपनी सूचीबद्ध (Listed) होणार आहे. १० जूनपर्यंत या आयपीओचे वाटप करण्यात येणार आहे.
 
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, प्राईज बँड प्रति समभाग (Shares) ३५ रुपये निश्चित करण्यात आला आहे. ४००० समभागांचा गठ्ठा (Lot) असणार आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी कमीत कमी १४०००० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. Fedex Securities Pvt Ltd ही कंपनी या आयपीओसाठी बुक लिडींग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे तर Cameo Corporate Services Limited कंपनी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे. मार्केट मेकर म्हणून Sunflower Broking कंपनी काम पाहील.
 
मार्केट मेकरला एकूण गुंतवणूकीपैकी ५.२० टक्के वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे. (Retail Investors) किरकोळ गुंतवणूकदारांसाठी एकूण समभागापैकी ४७.४० टक्के वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे तर इतरांसाठी उर्वरित वाटा उपलब्ध असणार आहे. दिव्येश मोदी, ख्याती मोदी हे कंपनीचे प्रमोटर (संस्थापक) आहेत.
 
कंपनीच्या आकडेवारीनुसार, २०१५ साली ही कंपनी स्थापन झाली होती. चादर ,कुशन, फोमवर आधारित असलेली तत्सम उत्पादने कंपनी बनवते. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कंपनीच्या महसूलात ३१ मार्च २०२३ मधील ९५५.२९ कोटीवरून घसरण होत ६३०.७४ कोटींवर पोहोचला होता. करोत्तर नफा (Profit After Tax) ३१ मार्च २२०३ मध्ये २४.५५ कोटींच्या तुलनेत २४.३६ कोटी मिळवला होता. कंपनीचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) २४.०४ कोटी रुपये आहे.
 
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या आयपीओतून उभारलेल्या निधीचा वापर वर्किंग कॅपिटल गरजेसाठी व दैनंदिन कामकाजासाठी वापरला जाणार आहे.