मुंबई मेट्रो ३ स्थानके होणार हिरवीगार

वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत २६०० झाडे लावण्यात येणार

    05-Jun-2024
Total Views |

metro 3


मुंबई,दि. ५ : 
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने सीप्झ, एम.आई.डी.सी, शितलादेवी, दादर, सिद्धिविनायक, सायन्स म्युझियम, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, सी.एस.एम.टी, चर्चगेट, विधान भवन आणि कफ परेड या १३ मेट्रो स्थानकांजवळ ५०० हून अधिक झाडे लावली असल्याची माहिती दिली आहे.
माननीय उच्च न्यायालय, मुंबईला सादर केलेल्या हमीपत्रानुसार, मुं.मे.रे.कॉ. मार्ग-३ च्या मेट्रो स्थानकांवर व शेजारच्या भागात सुमारे २६०० झाडे लावणार आहेत. त्यानुसार मुं.मे.रे.कॉ.ने मुळ जागी वृक्षारोपण करण्यासाठी तीन कंत्राट दिले आहेत. निवडलेले कंत्राटदार रोपवाटीकेत रुजलेल्या झाडांचा पुरवठा, लागवड आणि देखभाल करतील. स्थानकांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या झाडांची मुळ जागी लागवड नुकतीच सुरू झाली आहे.
“मुं.मे.रे.कॉ. वृक्षारोपण पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. विविध स्थानकांवर बांधकाम उपक्रम पूर्ण झाल्यावर आणि अधिक जागा उपलब्ध झाल्यावर वृक्षारोपण केले जाईल. आम्ही विविध घटकांना आमंत्रित करणारे सार्वजनिक आवाहन देखील जारी करणार आहोत; सरकारी/खाजगी आस्थापना, परिसर मालक, सहकारी गृहनिर्माण संस्था इ. त्यांच्या जागेत वृक्षारोपण स्वीकारण्यासाठी (किमान १० झाडे). मुं.मे.रे.कॉ.द्वारे नियुक्त केलेले कंत्राटदार वाढ झालेली झाडे लावनू त्यांची तीन वर्ष देखरेख करतील," असे मुं.मे.रे.कॉ. चे संचालक (नियोजन आणि रिअल-इस्टेट डेव्हलपमेंट/एन.एफ.बी.आर) आर. रमणा यांनी सांगितले.
निवडलेल्या झाडांमध्ये फुलांची झाडे, शोभेची झाडे, सदैव हिरवीगार झाडे इत्यादी ७ वर्ष वयाची आणि सर्वसाधारण उंची १५ फूट आहे. मळू जागी वृक्षारोपण मोहिमेसाठी निवडलेल्या वृक्षांच्या प्रजातींमध्ये महोगणी, बकुळ, पिंपळ, सोनचाफा, निलमोहोर, तामण, कदंब, देशी-बदाम, आकाश-नीम, स्पाथोडिया, ताबेबुया, अम्ब्रेला-वृक्ष, सप्तपर्णी, पिंपळ, पांगारा, जंगली बदाम, चाफा, इ. यांचा समावेश आहे. आता पर्यंत ५०० होऊन अधिक झाडे लावली आहेत, तयाांची तीन वर्ष देखरेख, नियमित सिंचन आणि बागायती पद्धतीसह त्याच कंत्राटदाराकडे असेल. लागवड केलेल्या झाडांमुळे परिसरातील सामान्य पर्यावरणाला फायदा होईल आणि पर्यावरणीय फायद्यांव्यतिरिक्त जैवविविधतेला मदत होईल.