“ज्यांनी राम मंदिर दिलं त्यांनाच... लाज वाटली पाहिजे अयोध्यावासीयांनो!”,सोनूने सुनावले खडे बोल

    05-Jun-2024
Total Views |

ram mandi
 
मुंबई : लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल ४ जून २०२४ रोजी जाहिर झाला. अटीतटीच्या लढतीत एनडीएने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. परंतु, अयोध्येतील लोकांनी ज्या सरकारने त्यांना राम मंदिर देऊ केले त्यांच्याकडेच पाठ फिरवल्यामुळे  सोनू निगम सिंग या एका नेटकऱ्याने अयोध्यावासियांचा तीव्र विरोध केला आहे.
 
सोनू निगम सिंग याने सोशल मिडियावर पोस्ट करत लिहिले आहे की, 'ज्या सरकारने संपूर्ण अयोध्या उजळून टाकली, नवे विमानतळ बांधली, देशाला उत्तम रेल्वे स्टेशन दिले, ५०० वर्षांनंतर राम मंदिर बांधले. त्या पक्षाने संपूर्ण मंदिर अर्थव्यवस्था निर्माण केली आहे आणि अयोध्येतील लोकसभेच्या जागेसाठी त्यांना संघर्ष करावा लागला,अयोध्यावासीयांना हे लज्जास्पद आहे".