“सासरला ही बहीण निघाली…; शिंदेशाही घराण्यातील १० भावांच्या एकूलत्या एक बहिणीचं झालं लग्न

    04-Jun-2024
Total Views |
 
utkarsha shinde
 
मुंबई : संगीत क्षेत्रातील लोकप्रिय घराणं म्हणजे शिंदेशाही. लोकसंगीताचा वारसा पिढ्या दर पिढ्या जपणाऱ्या शिंदे घराण्यातील १० भावांच्या एकूलत्या एख बहिणीचं थाटामाटत लग्न नुकतंच झालं. यासंदर्भात अभिनेता, गायक, संगीतकार उत्कर्ष शिंदेने सोशल मीडियावर भावुक पोस्ट केली आहे.
 
स्वरांजली मिलिंद शिंदे हीचं नुकतंच शाही लग्न झालं. या लग्नसोहळ्यातील खास क्षणांचा व्हिडीओ उत्कर्ष शिंदेने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये सर्व भावंडं भावुक होऊन बहिणीला निरोप देताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत उत्कर्षने लिहिलं आहे, “१० भावांची एक बहीण. कर्तृत्ववान, सहनशील, समजूतदार, मायाळू, लहानपणापासून सगळ्यांना जीव लावणारी आमची ‘ताई’. लग्नात हजारो शुभचिंतक जरी होते तरी आमची काकू ज्योती मिलिंद शिंदे यांची आम्हाला खूप आठवण आली. करोनामध्ये ती आम्हा सर्वांना सोडून गेली. काकूच्या नंतर सर्वात लहान असून ताईने आईची जागा घेत भावांना, काकाला प्रेमाने सांभाळलं. खऱ्या अर्थाने भावांचं नाक उंच ठेवणारी आमची ताई. सक्षम, संवेदनशील, परिपक्व विचारांची, आमची मैत्रीण तर कधी काकू तरी कधी आमच्या आजीच रुप घेणारी आमची ताई. तिच्या पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा. कधीच टेन्शन घेऊ नकोस तुझे भाऊ नेहमी तुझ्याबरोबर आहेत.”
 

utkarsha shinde 
 
उत्कर्षच्या या पोस्टवर आदर्श शिंदेने प्रतिक्रिया देत लिहिलं आहे की, “स्वरांजली कालचा दिवस हा फक्त तुझा होता. एका नवीन आयुष्याची सुरुवात होत असताना, तुझे भाऊ तुझ्या या प्रवासातही नेहमी तुझ्याबरोबर आहेत. तुला खूप खूप प्रेम आणि आशीर्वाद. तुझं पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीचे असो हिच प्रार्थना.”