संकर्षण आणि अमृताचं अपहरण! व्हिडिओ आला समोर

    04-Jun-2024
Total Views |
 
sankarshan and amruta
 
 
मुंबई : अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांचं अपहरण झालं आहे. इतकंच नव्हे तर त्यांचं अपहरण होतानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. घाबरलात? काळजी करु नका खरं अपहरण झालं नाही आहे तर झी मराठी वाहिनीवर एक नवी मालिका भेटीला येणार आहे त्याचा हा खास प्रोमो रिलिज करण्यात आला आहे.
 
झी मराठी वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात संकर्षण कऱ्हाडे आणि अमृता खानविलकर दिसणार आहेत. या मालिकेच्या प्रोमोमध्ये शूटिंग करत असलेल्या संकर्षण कऱ्हाडेचं अपहरण होत असल्याचं दिसतं. तर व्हॅनिटी व्हॅनमधून उतरलेल्या अमृतालाही किडनॅप केलं जातं. आता नेमकी का किडनॅप केलं आहे हे मालिका आल्यावरच समजणार आहे.
 
 
sankarshan and amruta
 
झी मराठीने हा व्हिडिओ शेअर करत कॅपश्न दिले आहे की, "दोन नामवंत मराठी कलाकारांचं अपहरण..! कोणी घडवून आणलंय हे सांर.. समजणार लवकरच...", असं म्हणत झी मराठीच्या ऑफिशियल पेजवरुन हा प्रोमो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या मालिकेचं नाव अद्याप गुलदस्त्यात असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेसाठी प्रेक्षकही उत्सुक असल्याचं दिसत आहे.