“देशात पुन्हा मोदीच पंतप्रधान व्हावेत”, हेमा मालिनींनी व्यक्त केली ईच्छा

    04-Jun-2024
Total Views |
 
hema malini
 
 
मुंबई : देशाचं संपुर्ण लक्ष सध्या लोकसभा निवडणूकीच्या निकालाकडे लागले देशभरात सर्वच राजकीय पक्षांची एकमेकांसोबत मोठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान, यंदा भाजपकडून हिंदी चित्रपटसृष्टीतील बड्या कलाकारांना तिकीट देण्यात आले होते. यात अभिनेत्री कंगना राणावत, हेमा मालिनी, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, रवी किशन यांची नावे आहेत. हेमा मालिनी या मथुरेतून निवडणूक लढत होत्या. सध्या त्या २ लाख मतांनी आघाडीवर आहेत.
 
यावेळी त्यांनी हेमा मालिनी यांनी आनंद व्यक्त करत म्हटले की, “मंदिरात जाऊन मी देवाचं दर्शन घेतलं. यावेळी मला फार छान आणि आनंदी वाटत आहे. आणि मला आनंद आहे की आम्ही चांगल्या मतांनी विजय मिळवत आहोत. आणि मला असं वाटतं की असाच देशातही आमचा म्हणजेच भाजपचा विजय झाला पाहिजे, ही माझी इच्छा आहे. देवाशी प्रार्थना आहे की मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान झाले पाहिजे. आणि देशाचा अधिक विकास व्हावा अशी इच्छा आहे”.
 
 
 
हेमा मालिनी मथुरेतून निवडणूक लढत असून सध्या त्या २ लाख २७ हजार ९३ मतांनी आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे हिमाचल प्रदेशमधून भाजपने पहिल्यांदाच अभिनेत्री कंगना राणावत हिला उमेदवारी दिली होती आणि तिने देखील मंडीत बाजी मारली आहे.