लोकसभा निवडणूक २०२४ : मध्य प्रदेशात सर्वच जागांवर कमळ फुललं; केद्रीय मंत्र्यांचा दणदणीत विजय!

    04-Jun-2024
Total Views |
madhya pradesh election result



नवी दिल्ली :   
  लोकसभा निवडणुकीच्या निकालानुसार मध्य प्रदेशात भाजपला सहज विजय मिळविता आला असून सर्वच जागांवर उमेदवार निवडून आले आहेत. मध्य प्रदेशातील एकूण २९ जागांवर भाजपने विजय मिळविला आहे. सर्वच जागांवर सर्वाधिक मताधिक्यावर भाजप उमेदवारांनी आपली जागा राखली आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना ५ लाखांनी आघाडी मिळाली आहे. गुना मतदारसंघामधून ८ लाख ६६ हजार मताधिक्यांनी विजय मिळविला आहे. गुनामधून काँग्रेसच्या यादवेंद्र सिंग यांचा ५ लाख मतांच्या फरकाने पराभव केला आहे. तर वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर असून पुन्हा एकदा जिंकणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

सात टप्प्यांमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कुणाला बहुमत मिळत सत्तास्थापनेची संधी मिळणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार का, हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे. यासोबतच एक्झिट पोलचे अंदाजही येऊ लागले असून बहुतांश ठिकाणी भाजपशी युती असलेल्या एनडीएला आघाडी मिळताना दिसत आहे.

दरम्यान, एनडीए विरुध्द इंडिया आघाडी यांच्यात लढत पाहायला मिळाली असून एक्झिट पोलनुसार एनडीए बहुमतासह तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करता येणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ०१ जून रोजी मतदान संपन्न झाल्यानंतर आता निवडणूकीच्या निकालाला अवघे काहीच तास उरले असून जनतेने कुणाला कौल दिलाय हे लवकरच कळणार आहे. या निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. कोण किती मतांनी आघाडीवर - येथे क्लिक करा