लोकसभा निवडणूक २०२४ : दिल्ली-गुजरातमध्ये इंडी आघाडीचा सुपडासाफ!

    04-Jun-2024
Total Views |
loksabha election indi alliance


नवी दिल्ली :      लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून दिल्लीमध्ये भाजपला सातही जागांवर आघाडीवर मिळविता आली आहे. दिल्लीत भाजपने आपचा सुपडासाफ केला असून सर्वच जागांवर निर्णायक आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपच्या बंसुरी स्वराज २५ हजारांनी आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, गुजरातमध्येदेखील भाजपला चांगलेच यश आल्याचे पाहायला मिळाले आहे. गुजरातमधील २५ जागांपैकी २४ जागांवर भाजपने विजय मिळविला आहे. तर काँग्रेसला केवळ एकाच जागावर मताधिक्य मिळविता आले आहे. त्यामुळे काँग्रेसने पुन्हा एकदा गुजरातमध्ये सपाटून मार खाल्ला आहे.

 कोण किती मतांनी आघाडीवर? -  येथे क्लिक करा

लोकसभा निवडणुकीतील ५४३ जागांपैकी ५४१ जागांवर आतापर्यंत सुरुवातीचे कल दाखवले जात आहेत. सध्या एनडीएला २८६ जागा मिळाल्या असून एनडीएला २३४ तर इतरांना २२ जागा मिळाल्या आहेत. १८ व्या लोकसभा निवडणुकीच्या ५४३ जागांसाठी पार पडलेल्या मतदानाचा निकाल येत्या ०४ जूनला जाहीर होणार आहे.

सात टप्प्यांमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कुणाला बहुमत मिळत सत्तास्थापनेची संधी मिळणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार का, हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे. यासोबतच एक्झिट पोलचे अंदाजही येऊ लागले असून बहुतांश ठिकाणी भाजपशी युती असलेल्या एनडीएला आघाडी मिळताना दिसत आहे.

दरम्यान, एनडीए विरुध्द इंडिया आघाडी यांच्यात लढत पाहायला मिळाली असून एक्झिट पोलनुसार एनडीए बहुमतासह तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करता येणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ०१ जून रोजी मतदान संपन्न झाल्यानंतर आता निवडणूकीच्या निकालाला अवघे काहीच तास उरले असून जनतेने कुणाला कौल दिलाय हे लवकरच कळणार आहे. या निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.