लोकसभा निवडणूक २०२४ : केरळात अखेर कमळ फुललं!

    04-Jun-2024
Total Views |
kerala loksabha resut bjp


नवी दिल्ली :      केरळमधील लोकसभेच्या एकूण २० जागांपैकी केवळ १ जागेवर भाजपला आघाडी मिळविता आला आहे. भाजपच्या सुरेश गोपी यांनी थ्रिसूर येथून तब्बल ७० हजार मतांच्या फरकाने विजय मिळविला आहे. सुरेश गोपी यांच्याविरोधात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार व्हीएस सुनिलकुमार यांचा पराभव केला आहे.

दरम्यान, कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला केरळ राज्यात भाजपला खातं उघडता आले आहे. सुरेश गोपी यांच्या रुपाने भाजपला केरळमध्ये आपलं खातं उघडता आले आहे. कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात भाजपने आपलं खातं उघडत नवी सुरूवात केली आहे. दक्षिण भारतात भाजपने चांगली कामगिरी केल्याचे आकड्यांवरून दिसते आहे.

सात टप्प्यांमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कुणाला बहुमत मिळत सत्तास्थापनेची संधी मिळणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार का, हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे. यासोबतच एक्झिट पोलचे अंदाजही येऊ लागले असून बहुतांश ठिकाणी भाजपशी युती असलेल्या एनडीएला आघाडी मिळताना दिसत आहे. कोण किती मतांनी आघाडीवर - येथे क्लिक करा