इंदूरमध्ये भाजप उमेदवाराचा विक्रमी विजय; तब्बल ११ लाख मते!

    04-Jun-2024
Total Views |
indore bjp candidate record



नवी दिल्ली :
    इंदौर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार शंकर लालवानी यांचा विक्रमी मतांच्या फरकाने विजय मिळविला आहे. शंकर लालवानी यांना तब्बल ११ लाख ७५ हजार मते मिळवित आपला गड राखला आहे. दरम्यान, इंदौर लोकसभा मतदारसंघात नोटालादेखील जनतेने पसंती दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

दरम्यान, नोटाला पसंती देणाऱ्या मतदारांची संख्या तब्बल २ लाखांपेक्षा अधिक असून दुसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे याच जागेवरून काँग्रेसच्या उमेदवाराने शेवटच्या क्षणी आपली उमेदवारी मागे घेतली होती. आता भाजपकडून ११ लाख ७५ हजारांनी विजय मिळविला आहे.

सात टप्प्यांमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कुणाला बहुमत मिळत सत्तास्थापनेची संधी मिळणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार का, हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे. यासोबतच एक्झिट पोलचे अंदाजही येऊ लागले असून बहुतांश ठिकाणी भाजपशी युती असलेल्या एनडीएला आघाडी मिळताना दिसत आहे. कोण किती मतांनी आघाडीवर - येथे क्लिक करा