“माझी प्रिय कंगना…”, मंडीतून विजयी झाल्यावर अनुपम खेर यांची खास पोस्ट

    04-Jun-2024
Total Views |
 
anupam kher
 
 
मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत हिने पहिल्यांदाच लोकसभा निवडणूकीत आपले नशीब आजमावले होते. भाजपने तिला हिमाचलप्रदेशमधील मंडीतून लोकसभेची उमेदवारी दिली होती आणि आनंदाची बाब म्हणजे ती जिंकून आली आहे. तिच्यावर या यशानंतर कौतुकांचा वर्षाव होत आहे. यात अभिनेते अनुपम खैर यांचाही समावेश असून त्यांनी कंगनाला अभिनंदन करत एक विशेष पोस्ट शेअर केली आहे.
 
कंगना राणावतचा व्हिडीओ शेअर करत अनुपम यांनी लिहिलं आहे, “माझी प्रिय कंगना, बहुमताने विजयी झाल्याबद्दल तुझं अभिनंदन. तू रॉकस्टार आहेस. तुझा आतापर्यंतचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. हिमाचल प्रदेश आणि मंडीमधील लोकांसाठी आणि तुझ्यासाठी खूप आनंद झाला आहे. तू वेळोवेळी सिद्ध केलं आहे की, जर एखाद्याने लक्ष केंद्रीत करून कठोर परिश्रम केले तर काहीही होऊ शकत. जय हो.”
 

anupam kher 
 
दरम्यान, कंगनाने आपली प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले होते की, “आमचे नेते नरेंद्र मोदींच्या नावावर निवडणूक लढवली आहे. मोदींवर जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे भाजपा तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आम्हाला हवे आहेत. मंडीचं भविष्य आता उज्ज्वल असणार आहे.”