बेबी धवन! वरुण-नताशाच्या घरी लक्ष्मीचे आगमन; पहिली पोस्ट करत म्हणाला, 'आमची लेक...'

    04-Jun-2024
Total Views |
 
varun dhawan
 
 
मुंबई : अभिनेता वरुण धवन आणि नताशा आई-बाबा झाले असून त्यांच्या घरी छोट्या परीचा जन्म झाला आहे. बाबा झाल्यानंतर वरुण धवनने आनंदी होत सोशल मीडिया पोस्ट केली आहे. धवन कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. ३ जून रोजी नताशाने गोंडस मुलीला जन्म दिला असून धवन कुटुंबीय लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी आतुर आहेत.
 
कन्यारत्न झाल्यानंतर वरुणने एक अॅनिमिटेड व्हिडिओ शेअर करत लिहिले, "our baby girl is here. आई आणि बाळासाठी शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. हरे राम हरे कृष्ण!'
 

varun dhawan 
 
वरुण धवनच्या या पोस्टवर सगल्यांनीच शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. शाळेपासूनची मैत्री, मग प्रेम आणि आता त्यांच्या प्रेमाचा प्रवास आता आईबाबा होण्यापर्यंत पुर्ण झाला आहे. या वर्षात हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कपल्सने आनंदाच्या बातम्या दिल्या. यामी गौतमने मुलाला जन्म दिला. तर अभिनेत्री रिचा चड्डा आणि दीपिका पडूकोण लवकरच गोड बातमी देणार आहेत.