लाखो समर्थकांची पाठीशी पॉवर; अशी-तशीच उडवत नाही कॉलर!

उदयनराजेंची विजयी प्रतिक्रिया

    04-Jun-2024
Total Views |

Udayanraje Bhosle 
 
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपली गादी कायम ठेवली आहे. त्यांच्याविरोधात शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे मैदानात होते. दरम्यान, उदयनराजेंनी त्यांचा पराभव करत सातारा लोकसभेत विजय मिळवला आहे.
 
मराठा सम्राज्याची राजधानी असलेल्या साताऱ्यातून यंदा भाजपकडून छत्रपती उदयनराजेंनी निवडणुक लढवली. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे होते. साताऱ्यातील ही लढाई छत्रपती उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे अशी दिसत असली तरी खरी लढाई ही छत्रपती उदयनराजे विरुद्ध शरद पवार अशीच असणार आहे. त्यामुळे साताऱ्यातील छत्रपती उदयनराजे विरुद्ध शरद पवार ही लढाई प्रतिष्ठेची झाली होती.
 
हे वाचलंत का? -  शिंदेंनी ठाण्याचा गड राखला!
 
दरम्यान, छत्रपती उदयनराजे यांनी ५ लाख ६३ हजार १६७ मतं घेत विजयी झाले आहेत. तर शशिकांत शिंदे ५ लाख ३१ हजार १३२ मतांनी पिछाडीवर होते. म्हणजेच छत्रपती उदयनराजेंनी जवळपास ३ लाख मतांनी लीड घेतल्याने साताऱ्यात भाजपचे कमळ फुलले आहे.
 
विजयानंतर छत्रपती उदयनराजेंनी फेसबूकवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. "लाखो समर्थकांची पाठीशी पॉवर; अशी-तशीच उडवत नाही कॉलर," अशी प्रतिक्रिया त्यांनी आपल्या विजयावर व्यक्त केली आहे.
कोण किती मतांनी आघाडीवर हे जाणून घेण्यासाठी - 
इथे क्लिक करा!