आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलात घसरण ' इतक्या ' टक्क्यांनी निर्देशांक घसरला !

एमसीएक्सवरील निर्देशांकात १.३९ टक्क्यांनी घसरण

    04-Jun-2024
Total Views |

Crude Oil
 
मुंबई: आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रूड (कच्च्या) तेलाच्या निर्देशांकात घट झाली आहे. ओपेक राष्ट्रांच्या बैठकीतील उत्पादन कपात पुढे ढकलला गेल्याच्या निर्णयानंतर बाजारात क्रूड तेलाच्या दरात स्थिरता आली आहे.त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील या वर्षातील सर्वाधिक घसरण कच्च्या तेलाच्या दरात झाली आहे. संध्याकाळपर्यंत कच्च्या तेलाच्या निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे.
 
WTI Future क्रूड निर्देशांकात १.८३ टक्क्यांनी घसरण झाली आहे. Brent क्रूड तेलाच्या निर्देशांकात १.६५ टक्क्यांनी घसरण झाली. भारतातील एमसीएक्स (MCX) निर्देशांकात १.३९ टक्क्यांनी घसरण होत तेलाचे दर ६०९५.०० रुपये प्रति बॅरेलवर पोहोचला आहे. जागतिक तेलाची मागणी मंद दिसत असताना आणि ओपेक नसलेल्या सदस्यांकडून मजबूत पुरवठा कायम असतानाही हा उत्पा दनात कपात करण्याचा निर्णय ओपेक राष्ट्रांकडडून घेण्यात आला आहे.