रायगडमध्ये पुन्हा एकदा सुनील तटकरेंचीच हवा!

    04-Jun-2024
Total Views |
 
Sunil Tatkare
 
रायगड : लोकसभा निवडणूकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी आठ वाजतापासून मतमोजणी सुरु झाली होती. दरम्यान, रायगड लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनी बाजी मारली आहे.
 
रायगड लोकसभेतून महायूतीने सुनील तटकरेंना उमेदवारी दिली होती. तर महाविकास आघाडीने उबाठा गटाच्या अनंत गीते यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे याठिकाणी तटकरे विरुद्ध गीते असा थेट सामना होता. दरम्यान, रायगडमध्ये सुनील तटकरेंनी आपला गड कायम ठेवला आहे.
 
हे वाचलंत का? -  लाखो समर्थकांची पाठीशी पॉवर; अशी-तशीच उडवत नाही कॉलर!
 
सुनील तटकरे यांनी ५ लाख ८ हजार ३५२ मतं मिळवत विजय मिळवला तर अनंत गीतेंना ४ लाख २५ हजार ५६८ मतांवर समाधान मानावं लागलं. म्हणजेच सुनील तटकरेंनी तब्बल ८२ हजार ७८४ मतांनी लीड घेत विजय मिळवला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर ही पहिलीच लोकसभा निवडणूक होती. त्यामुळे ही लढाई प्रतिष्ठेची बनली होती.
कोण किती मतांनी आघाडीवर हे जाणून घेण्यासाठी - इथे क्लिक करा!