जळगावमध्ये भाजपचा डंका! स्मिता वाघ मोठ्या मताधिक्याने विजयी

    04-Jun-2024
Total Views |
 
Smita Wagh 
 
जळगाव : जळगाव लोकसभेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून याठिकाणी भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपच्या स्मिता वाघ या जळगावमधून विजयी झाल्या आहेत. त्यांनी जवळपास दोन लाखांनी विजय मिळवत उबाठा गटाला धक्का दिला आहे.
 
हे वाचलंत का? -  उत्तर मुंबईत भाजपचा दणदणीत विजय! पीयूष गोयल यांच्या रुपाने हॅट्रीक!
 
जळगाव लोकसभेतून महायूतीकडून स्मिता वाघ या रिंगणात होत्या. तर उबाठा गटाने करण पवार यांना उमेदवारी दिली होती. स्मिता वाघ आणि करण पवार यांच्यात चुरशीची लढत होती. सकाळी ८ वाजतापासून सुरु झालेल्या मतमोजणीनंतर दुपारी २ वाजता स्मिता वाघ यांच्या रुपाने भाजपने जळगावमध्ये विजयाचा गुलाल उधळला आहे. दरम्यान, स्मिता वाघ यांना ५ लाख २१ हजार ३३ मतांनी विजय मिळाला आहे. करण पवार हे ३ लाख १२ हजार ७९१ मतं घेत पराजयी झाले आहेत.