महायुतीच्या श्रीरंग बारणेंचा विजय जवळपास निश्चित!

    04-Jun-2024
Total Views |
Shrirang Barne news

मुंबई
: मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांचा विजय जवळपास निश्चित आहे. बारणे ९४ हजार २९७ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात उबाठा गटाकडून संजोग वाघेरे पाटील मैदानात होते. दरम्यान संजोग वाघेरे पाटील पिछाडीवर आहेत. तसेच या मतदारसंघात वंचित बहुजन विकास आघाडीकडून माधवीताई जोशी या तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

दरम्यान आतापर्यंत पुढे आलेल्या आकडेवारीनुसार, श्रीरंग बारणे यांना ५ लाख ७८ हजार २९१ मते मिळाली आहेत. तर उबाठा गटाचे ४ लाख ८१ हजार ६५१ मते मिळाले आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीच्या माधवीताई जोशी आहेतय. ज्यांना २२ हजार ७९४ मते मिळाले आहेत. मात्र सातव्या टप्प्याच्या मतदाना नंतर जाहीर झालेल्या पोल मध्ये 'उबाठा' गटाचे संजोग वाघेरे विजयी ठरतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतू चित्र काहीसे वेगळेच पाहायला मिळत आहे. ते तब्बल ९६ हजार ६४० मतांनी पिछडीवर आहेत.