शेअर बाजार अपडेट: बाजारात आपटी अनेक जण कंगाल? सेन्सेक्स ३५६९.२१ अंशाने व निफ्टी ११४२.५० अंशाने घसरला

सगळ्या समभागात घसरण तर बँक निर्देशांकातही घसरण कायम

    04-Jun-2024
Total Views |

Stock Market
 
 
मुंबई: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी आपटी खाल्ली आहे. विशेषतः बाजारात अनपेक्षित निवडणूक निकालाचे कौल बघता लोकांची निराशा झाली आहे. भाजपचे मिशन ४०० पूर्ण होण्याची स्वप्न धूसर झाली असताना बाजाराचेही अखेरच्या सत्रात स्वप्नभंग होईल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.बीएसईत ३५६९.२१ अंशाने घसरत ७३०३३.३० पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टीत ११४२.५० अंशाने २२१२१.४० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स तब्बल ४.७० अंशाने तर निफ्टी ४.९१ टक्क्यांनी घसरला आहे.
 
सेन्सेक्स बँक निर्देशांकात ७.२० टक्क्यांनी व ४१९७ अंशाने घसरत ५४०९२.५६ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी बँक निर्देशांकात ६.१७ टक्क्यांनी घसरण म्हणजेच ३१४४.२५ अंशाने घसरत ४७८३५.२५ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सगळ्याच प्रकारच्या समभागात पडझड झाली आहे. सर्वाधिक घसरण निफ्टी पीएसयु (१३.४७%) समभागात झाले असून याशिवाय तेल गॅस (९.३०%), मेटल (८.६७%), बँक (५.३०%), फायनांशियल सर्विसेस (५.६६%), ऑटो (३.४९%) समभागात घसरण झाली आहे. एकही समभागात आज वाढ झालेली नाही.
 
कालपर्यंत बाजारातील ' अंडरकरंट ' कायम असताना बाजारातील गुंतवणूकदारांना भाजपा पुन्हा सत्तेत येण्याची आशा होती व आहे मात्र सकाळच्या सत्रात विरोधी पक्षांच्या बाजूनेही तुलनात्मकदृष्ट्या कौल आल्याने बाजारात प्रचंड मोठी पडझड झाली आहे. पर्यायाने बँक निर्देशांकातही पडझड झाली आहे. बीएसई मिडकॅप मध्ये १६५.५५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.स्मॉल कॅपमध्ये २१.२५ टक्क्यांनी घसरला आहे. एनएसईत मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ४.८० व ५.३२ टक्क्यांनी वाढ घसरण झाली आहे.
 
विशेषतः बाजारातील लार्जकॅप मध्येही मोठी घसरण झाली आहे. विशेषतः कालच बाजारात २३०० अंशापर्यंत बाजारात वाढ झाल्याने किरकोळ गुंतवणूकदाराना आजही बाजारात वाढ होईल असे वाटत होते मात्र आज किरकोळ गुंतवणूकदारांसाठी मोठा धक्का बसला आहे.
 
बीएसईत एचयुएल, नेस्ले, सनफार्मा, एशियन पेंटस, एचसीएलटेक, टीसीएस या समभागात वाढ झाली आहे तर एनटीपीसी, पॉवर ग्रीड, लार्सन, भारती एअरटेल, इंडसइंड बँक, इंडसइंड बँक, टाटा स्टील, जेएसडब्लू स्टील, एक्सिस बँक, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, एचडीएफसी बँक, आयटीसी, मारूती सुझुकी , टायटन कंपनी, विप्रो, टेक महिंद्रा, एशियन पेंटस समभागात घसरण झाली आहे.
 
एनएसईत एचयुएल, ब्रिटानिया, सनफार्मा, सिप्ला, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, सिप्ला, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, एशियन पेंटस, हिरो मोटोकॉर्प, डिवीज , एचसीएलटेक, टीसीएस, इन्फोसिस या समभागात वाढ झाली आहे तर एनएसईत अदानी पोर्टस, अदानी एंटरप्राईज, कोल इंडिया, पॉवर ग्रीड, एनटीपीसी, ओएनजीसी, एसबीआय, एसबीआय, बीपीसीएल, लार्सन, हिंदाल्को, टाटा स्टील, भारती एअरटेल, जेएसडब्लू स्टील, रिलायन्स, एक्सिस बँक, टाटा मोटर्स, टाटा स्टील, एम अँड एम, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, आयशर मोटर्स, टायटन कंपनी, विप्रो, अपोलो हॉस्पिटल, डॉ रेड्डीज, इन्फोसिस या समभागात नुकसान झाले आहे.