महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसेंचा विजय!

    04-Jun-2024
Total Views |
Raver Lok Sabha Election Results 2024

रावेर :
रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसेंचा विजय झाला आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे श्रीराम पाटील अशी मुख्य लढत झाली. दि. ४ जून रोजी झालेल्या मतमोजणीत सकाळपासून रक्षा खडसे आणि श्रीराम पाटील यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. सध्या रक्षा खडसे यांना ६ लाख २७ हजार ६७२ मते मिळाली आहेत. तर श्रीराम पाटील यांना ३ लाख ६ हजार ६२४ मते मिळाली आहेत. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे संजय बरामाने हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

तरी रक्षा खडसे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या श्रीराम पाटील यांच्यापेक्षा २ लाख ७१ हजार ०४८ मतांची आघाडी घेतली आहे. या मतदारसंघात २४ उमेदवार रिंगणात होते. तरी मुख्य लढत रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील अशीच पाहायला मिळाली. या जागेसाठी शरद पवार जागावाटपात आग्रही असल्याचे ही पाहायला मिळाले होते.