पालघरमध्ये महायुतीच्या डॉ. हेमंत सवरांची विजयाकडे कूच!

    04-Jun-2024
Total Views |
hemat savra

वसई :
पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार हेमंत सवरा हे १ लाख २७ हजार ३०३ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात उबाठा गटाच्या भारती कामडी या रिंगणात होत्या. दरम्यान भारती कामडी या सध्या पिछाडीवर आहेत.


हे ही वाचा : नारायण राणेंचा विजय निश्चित! विनायक राऊतांना आस्मान दाखवणार!
 
उबाठा गटाकडून पालघर लोकसभा मतदारसंघात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भारती कामडी यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर त्यांच्यासमोर भाजपचे हेमंत सवरा यांचं आव्हान होतं. तसेच या मतदारसंघात बहुनज विकास आघाडीचे राजेश पाटील सुद्धा मैदानात होते. त्यांना सध्या १ लाख ६१ हजार ९४७ मते मिळाली आहेत.

दरम्यान आतापर्यंत पुढे आलेल्या आकडेवारीनुसार, हेमंत सवरा यांना ४ लाख ४ हजार ६३५ मते मिळाली आहेत. तर उबाठा गटाच्या भारती कामडी यांना २ लाख ७७ हजार ३३२ आणि बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील ह्यांना १ लाख ६५ हजार ५८६ मते मिळाली आहेत.