शिंदेंनी ठाण्याचा गड राखला!

    04-Jun-2024
Total Views |
 
Shinde
 
ठाणे : एकनाथ शिंदेंनी ठाण्याचा गड आपल्याकडे राखण्यात यश मिळवलं असून ठाणे लोकसभेतून महायूतीचे उमेदवार नरेश म्हस्के विजयी झाले आहेत. त्यांनी विद्यमान खासदार आणि उबाठा गटाचे उमेदवार राजन विचारे यांचा पराभव केला आहे. त्यामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.
 
शिवसेनेत फूट पडल्यानंतर यावर्षीची ही पहिलीच लोकसभा निवडणूक होती. यावेळी ठाणे लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा थेट सामना रंगला होता. याठिकाणी महायूतीकडून शिवसेनेचे नरेश म्हस्के तर महाविकास आघाडीकडून उबाठा गटाचे राजन विचारे रिंगणात होते.
 
हे वाचलंत का? -  सांगलीत उबाठा गटाला दणका! काँग्रेसची खेळी यशस्वी?
 
ठाणे लोकसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासूनच शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो. दरम्यान, यावेळी शिंदे आपला गड राखण्यात यशस्वी झाले आहेत. नरेश म्हस्के यांनी ५ लाख ८७ हजार ३२३ मताधिक्याने विजय मिळवला आहे. राजन विचारेंच्या तुलनेत ते दीड लाख मतांनी आघाडीवर आहेत.
कोण किती मतांनी आघाडीवर हे जाणून घेण्यासाठी - इथे क्लिक करा!