नारायण राणेंचा विजय निश्चित! विनायक राऊतांना आस्मान दाखवणार!

    04-Jun-2024
Total Views |
 
Rane & Raut
 
रत्नागिरी : लोकसभेच्या निकालाकडे सध्या संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असून राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मदारसंघातून नारायण राणे हे सध्या आघाडीवर असून त्यांचा विजय निश्चित असल्याचं बोललं जात आहे.
 
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध उबाठा अशी थेट लढत आहे. याठिकाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध उबाठा गटाचे विनायक राऊत मैदानात होते. दरम्यान, आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत नारायण राणे हे जवळपास ३६ हजार मताधिक्याने आघाडीवर आहेत. नारायण राणेंची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु असून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचा जल्लोष साजरा करण्यात येत आहे. 
 
हे वाचलंत का? -  महायुती विरुद्ध महाविकास आघाडी काँटे की टक्कर!
 
कोकणात विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा संघर्ष सुरू झाला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील ही लढाई राणे विरूद्ध राऊत असली अशी तरी खरी लढाई ही नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे अशीच असणार आहे. या लढाईचा निकाल कोकणात कुणाचं वर्चस्व आहे हे निश्चित करेल. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कोण किती मतांनी आघाडीवर आहे हे जाणून घेण्यासाठी - इथे क्लिक करा!