ठाकरेंना दणका! नारायण राणेंच्या रुपात कोकणात कमळ फुलले

    04-Jun-2024
Total Views |

Narayan Rane 
 
रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार नारायण राणे यांचा दणदणीत विजय झाला आहे. नारायण राणेंनी उबाठा गटाच्या विनायक राऊतांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत कोकणात भाजपचे कमळ फुलवले आहे.
 
 
 
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध उबाठा अशी थेट लढत होती. याठिकाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उबाठा गटाचे विनायक राऊत यांच्यात सामना रंगला होता. दरम्यान, या निवडणूकीत नारायण राणेंना ४ लाख ४८ हजार ५१४ मतं मिळाली आहेत. तर विनायक राऊतांना ४ लाख ६५६ मतं मिळाली आहेत. नारायण राणेंनी तब्बल ४७ हजार ८५८ मताधिक्याने लीड घेतली आहे.
 
हे वाचलंत का? -  रायगडमध्ये पुन्हा एकदा सुनील तटकरेंचीच हवा!
 
नारायण राणेंच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचा जल्लोष साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, या विजयाबद्दल नारायण राणेंनी कोकणच्या जनतेचे आभार मानले आहेत. तसेच भविष्यात कोकणाचा विकास नव्या उंचीवर नेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
 कोण किती आघाडीवर हे जाणून घेण्यासाठी - इथे क्लिक करा!