रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत नारायण राणे आघाडीवर! उबाठा गटाला धक्का

    04-Jun-2024
Total Views |

Rane & Raut 
 
रत्नागिरी : संपुर्ण देशभरात सध्या लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरु असून राज्यात महायूती आणि महाविकास आघाडीपैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचे नारायण राणे आघाडीवर आहेत.
 
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत भाजप विरुद्ध उबाठा अशी थेट लढत आहे. नारायण राणेंविरुद्ध उबाठा गटाचे विनायक राऊत मैदानात होते. दरम्यान, आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत नारायण राणेंना १ लाख ५३ हजार ५२४ मतं मिळाली आहेत. तर विनायक राऊत १ लाख ३९ हजार २८३ मतांनी पिछाडीवर आहेत. याचाच अर्थ नारायण राणे जवळपास १४ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
 
हे वाचलंत का? -  नणंद की, भावजय? बारामतीत कुणाची बाजी?
 
नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर कोकणात विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा संघर्ष सुरू झाला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील ही लढाई राणे विरूद्ध राऊत असली अशी तरी खरी लढाई ही नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे अशीच असणार आहे. या लढाईचा निकाल कोकणात विशेषत: तळ कोकणात कुणाचं वर्चस्व आहे हे निश्चित करेल. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील लढाईकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे.