पुण्याच्या पैलवानानं दाखवलं विरोधकांना आस्मान! मुरलीधर मोहोळ विजयी!

    04-Jun-2024
Total Views |
Muralidhar Mohal news

पुणे :
पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे ६६ हजार ५८९ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे रविंद्र धंगेकर मैदानात होते. दरम्यान रविंद्र धंगेकर सध्या पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या वसंत मोरेंना आतापर्यंत फक्त २२ हजार ३०० मते मिळाली आहेत.
दरम्यान आतापर्यंत पुढे आलेल्या आकडेवारीनुसार, मुरलीधर मोहोळ यांना ३ लाख ५९ हजार १५८ मते मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांना २ लाख ८८ हजार ९२४ मते मिळाली आहेत. तरी या दुहेरी लढतीत मोहळ यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.