उत्तर पश्चिममध्ये फेरमतमोजणी, नक्की काय होणार? वायकर आघाडीवर!

    04-Jun-2024
Total Views |
Mumbai North West News

मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकरांना मतमोजणीत लीड मिळालेली होती. पण आता मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात फेर मतमोजणी होत आहे. त्यामुळे आता मुंबई उत्तर पश्चिममध्ये काही चित्र बदलते का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. सद्या रविंद्र वायकर ७५ मतांनी आघाडीवर आहेत. तर अमोल किर्तीकर यांना ४ लाख ४३ हजार ४०३ मते मिळाली आहेत.
हे ही वाचा : ठाकरेंना दणका! नारायण राणेंच्या रुपात कोकणात कमळ फुलले
 
हा मतदारसंघ सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला होता. कारण ठाकरे गटाने अमोल किर्तीकरांना उमेदवारी जाहिर केल्यावर काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ज्यानंतर मतदानांनंतर गजाजन किर्तीकर यांनी ही अमोल किर्तीकरांच्या समर्थनार्थ विधान केले होते. ज्यामुळे या निकालाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.