उत्तर पश्चिममध्ये अमोल किर्तीकरांना वायकरांची कडवी झुंज!

    04-Jun-2024
Total Views |

Waikar VS Kirtikar


मुंबई : उत्तर पश्चिम लोकसभा निवडणूकीत उबाठाचे अमोल किर्तीकर विरुद्ध महायुतीचे रवींद्र वायकर यांच्यात काँटे की टक्कर पहायला मिळत आहे. सुरुवातीपासून अमोल किर्तीकर यांनी आघाडी घेतलेल्या या मतदार संघात आता रवींद्र वायकरही कडवी झुंज देताना पहायला मिळत आहेत. हातात कमी दिवस असताना नाव घोषित झाल्यानंतर वायकर यांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले होते. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांचे सुपूत्र अमोल किर्तीकर यांना तिकीट जाहीर केलं होतं.
 
विशेष म्हणजे गजानन किर्तीकर हे एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेत महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात फिरताना दिसले असल्याने या मतदार संघावर संपूर्ण महाराष्ट्राची नजर होती. वडिलांसोबत असताना अमोल किर्तीकर यांनी हा मतदार संघ पिंजून काढल्याचा फायदा अमोल किर्तीकर यांना होताना दिसत आहेत. मात्र, १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपीचा प्रचारात सामावेश आणि उद्धव ठाकरेंची मुस्लीम मतांवर असलेली मदार हे कळीचे मुद्दे या निवडणूकीत ठरले.
कोण किती मतांनी आघाडीवर जाणून घेण्यासाठी - इथे क्लिक करा!