लोकसभा निवडणूक २०२४! कंगना राणावत मंडीतून ३६ हजार मतांनी आघाडीवर

    04-Jun-2024
Total Views |
 
kangana
 
 
 
मुंबई : लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालाची रणधुमाळी आज ४ जून २०२४ रोजी सुरु झाली आहे. संपुर्ण देशाचं लक्ष या मतदान मोजणीवर लागले असून मंडीतून भाजपसाठी आनंदाची वार्ता येत आहे. अभिनेत्री कंगना राणावत हिला मंडीतून तिकिट देण्यात आलं होतं. मंडीमध्ये कंगना राणावतच्या विरोधात माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह आणि सध्याच्या खासदार प्रतिभा सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. आणि सध्या कंगना ३६ हजार मतांनी आघाडीवर आहे.
 
 
 
 
हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत कायमच पाहायला मिळाली आहे. आता या दोन्ही पक्षांतील तरुण चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून कंगनाने बाजी मारलेली दिसून येत आहे.