उत्तर प्रदेशात इंडी आघाडीची तगडी लढत! अमेठीतून स्मृती इराणी पिछाडीवर

    04-Jun-2024
Total Views |
 smriti irani
 
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकालाचे सुरुवाती कल समोर येत आहेत लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये लढत ही भाजपप्रणित एनडीए आघाडीत आणि इंडी आघाडीत आहे. सुरूवातीच्या कलानुसार दोन्ही आघाडींमध्ये चुरशीची लढत आहे. भाजपप्रणित इंडी आघाडीला उत्तर प्रदेशात अनपेक्षित यश मिळताना दिसत आहे.
 
सुरूवातीच्या कलानुसार, भाजपप्रणित एनडीएला बहुमत मिळताना दिसत आहे. तरीही बाल्लेकिल्ला असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये लढत चुरशीची झाली आहे. भाजपचे दिग्गज उमेदवार असलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या अमेठी लोकसभा मतदारसंघात पिछाडीवर आहेत. तर सुल्तानपुर लोकसभा मतदारसंघातून भाजप नेत्या आणि नऊ वेळेच्या खासदार मेनका गांधी पिछाटीवर आहेत.
 
  
लोकसभेच्या ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष ३५ जागांवर आघाडी मिळवली आहे. देशभरात भाजपप्रणित एनडीए आघाडीला २९० जागांवर आघाडी मिळाली आहे. तर इंडी आघाडीने आतापर्यंत २२९ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर इतर उमेदवारांवा २४ जागांवर आघाडी मिळवता आली आहे. सुरुवातीलच्या कलानुसार भाजपला महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणामध्ये २०१९ च्या तुलनेत कमी जागा मिळत आहेत.
 
महाराष्ट्राचा ४८ लोकसभा मतदारसंघात १७ जागांवर महायुतीने आघाडी मिळवली आहे. तर ३० जागांवर महाविकास आघाडी पुढे आहे. देशात एकूण सात टप्प्यात मतदान पार पडले होते. दि. १६ मार्च २०२४ ला केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक वेळापत्रकाची घोषणा केली होती. निवडणुक घोषणेनंतर संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली होती.
  
लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान १९ एप्रिल, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे, चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे, पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे, सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे, सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडलं होते. त्यानंतर आज दि. ४ जून २०२४ ला मतमोजणी होत आहे.
  
महाराष्ट्राच्या ४८ लोकसभा मतदारसंघासाठी पाच टप्प्यात मतदान झाले होते. महाराष्ट्रातील लढाई ही भाजपप्रणित महायुती आणि विरोधकांच्या महाविकास आघाडीत होती. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकीच्या निकालावर संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.