गुजरात आणि मध्य प्रदेशात इंडी आघाडीचा सुफडा साफ; दोन्ही राज्यात सर्वच्या सर्व जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर

    04-Jun-2024
Total Views |
 Gujarat
 
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४ ची निवडणुकीची अर्धी मतमोजणी जवळपास पूर्ण झाली आहे. आतापर्यंत आलेल्या कलानुसार भाजप्रणित एनडीए आणि काँग्रेसप्रणित इंडी आघाडीमध्ये चुरशीची लढत होत आहे. आतापर्यंत आलेल्या कलानुसार, एनडीए ३०० चा टप्पा गाठण्याच्या जवळ आहे. तर इंडी आघाडीने आतापर्यंत २२९ जागांवर आघाडी मिळवली आहे.
 
सुरुवातीलच्या कलानुसार भाजपला महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणामध्ये २०१९ च्या तुलनेत कमी जागा मिळत आहेत. याउलट भाजपनं गुजरात आणि मध्यप्रदेशमध्ये विरोधकांचा सुफडा साफ केला आहे. मध्य प्रदेशात लोकसभेच्या २९ जागा आहेत. आतापर्यंत आलेल्या कलानुसार, मध्य प्रदेशात भाजप सर्वच्या सर्व २९ जागांवर आघाडीवर आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपला मध्य प्रदेशात २९ पैकी २८ जागांवर विजय मिळवला होता.
  
मध्य प्रदेशबरोबरचं गुजरातमध्ये सुद्धा भाजपनं २६ पैकी २६ जागांवर आघाडी मिळवून आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपनं गुजरातमध्ये सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या. लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान १९ एप्रिल, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे, चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे, पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे, सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे, सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडलं होते. त्यानंतर आज दि. ४ जून २०२४ ला मतमोजणी होत आहे.