लोकसभेच्या विजयानंतर कंगनाची पहिली पोस्ट; श्रेयस तळपदेने केली खास कमेंट

    04-Jun-2024
Total Views |
 
kangana
 
 
मुंबई : लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतमोजणीला आज ४ जून २०२४ रोजी सुरुवात झाली असून सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये चुरशीची लढत दिसून येत आहे. अशात पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवणारी अभिनेत्री कंगना राणावत हिने हिमाचलप्रदेशमधील मंडी येथून विजय मिळवला आहे. आणि यानंतर तिने सोशल मिडियावर पोस्ट करत सगळ्यांचे आभार मानले आहे.
 
कंगनाने पोस्ट शेअर करत मतदारांचे आभार मानले आहेत. ती लिहिते, "तुम्ही दाखवलेला विश्वास आणि दिलेलं प्रेम यासाठी समस्त मंडीवासियांचे मी आभार मानते. हा विजय तुम्हा सर्वांचा आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपावरील विश्वासाचा हा विजय आहे. सनातन धर्म आणि मंडीच्या सन्मानाचा हा विजय आहे".
 

kangana  
 
दरम्यान, कंगनाच्या या पोस्टवर बऱ्याच जणांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आणि यात अभिनेता श्रेयस तळपदेची कमेंटही दिसत आहे. श्रेयसने कंगनाच्या पोस्टवर कमेंट केली आहे. "Heartiest congratulations", अशी कमेंट करत श्रेयसने कंगनाचं अभिनंदन केलं आहे.