पालघरमध्ये हेमंत सावरा आघाडीवर!

    04-Jun-2024
Total Views |
 
Hemant Sawara
 
पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार हेमंत सावरा हे ७६ हजार ९०९ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात उबाठा गटाच्या भारती कामडी या मैदानात होत्या. दरम्यान, भारती कामडी या सध्या पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.
 
पालघर लोकसभा मतदारसंघात उबाठा गटाकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी यांनी उमेदवारी देण्यात आली होती. तर त्यांच्यासमोर भाजपच्या हेमंत सावरा यांचं आव्हान होतं. तसेच या मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटीलसुद्धा मैदानात होते.
 
 
दरम्यान, आतापर्यंत पुढे आलेल्या आकडेवारीनुसार, हेमंत सावरा हे २ लाख ७७ हजार ५२० मतांनी आघाडीवर आहेत. तर उबाठा गटाच्या भारती कामडी २, ००, ८७५ आणि बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील हे १ लाख १९ हजार ४१४ मतांनी पिछाडीवर आहेत. दरम्यान, या तिरंगी लढतीत पालघरमध्ये कोण बाजी मारणार, याबद्दल सर्वांना उत्सुकता लागली आहे.