“तुम्ही बोलण्यातली सभ्यता…”, अविनाश नारकरांनी नेटकऱ्याला फटकारले

    04-Jun-2024
Total Views |
 
Avinash Narkar
 
मुंबई : कलाकारांना सोशल मिडियावर कोणत्याही कारणाने ट्रोल करणं सुरुच असतं. कधी त्यांच्या राजकीय, सामाजिक मतांवरुन तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींवरुन त्यांना कायम टार्गेट केलं जातं. सध्या अभिनेते अविनाश नारकर यांना नेटकऱ्याने त्यांच्या डान्सवरुन ट्रोल केले आहे. अविनाश नारकर त्यांच्या पत्नी ऐश्वर्या नारकर सोबत सोशल मीडियावरील ट्रेण्ड फॉलो करताना दिसत असतात. नुकताच अविनाश यांनी एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला होता. ज्यावर एका नेटकऱ्याने असभ्य भाषेत प्रतिक्रिया दिली असून नारकरांनी सडेतोड उत्तर दिलं.
 
“सुट्ट्या सुरू आहेत…मस्त फिरून या…बिना पैस…”, असं कॅप्शन देत अविनाश नारकरांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. पण एका नेटकऱ्याने असभ्य भाषेत प्रतिक्रिया दिली. नेटकऱ्याने लिहिले आहे की, “अरे भिकारड्यांनो पुण्यात दोन तरुण मुलं धनदांडग्यांच्या हरामखोर पोराने ठार मारली गाडीखाली चिरडून. आधी थोड खेद, दुःख राग व्यक्त करा. षंढासारखे नुसते भिऊन नाचता काय थेरड्यांना?” या प्रतिक्रियेचं उत्तर त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर दिलं आहे. अविनाश नारकर त्या नेटकऱ्याला उत्तर देत म्हणाले, “तुम्ही बोलण्यातली सभ्यता किमान जपा.”
 

Avinash Narkar
Avinash Narkar