ठाणे : ठाण्याच्या हाजुरी भागात जिहादी उन्मादी जिहांदीवर अखेर वागळे इस्टेट पोलिसांनी शनिवारी रात्री गुन्हा दाखल केला. सकल हिंदु समाजाचे विजय त्रिपाठी आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी हाजुरीत उन्माद माजवणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तांना साकडे घातले होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी हिंदु संघटनांनी केली होती. त्यानुसार,पोलिसांनी हाजुरीतील कथित नेता अफराक सिद्दीकी, त्याचा साथीदार इस्तियाक आणि अन्य एक जणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ठाण्यातील वागळे इस्टेट,हाजुरी भागात काही दिवसांपूर्वी शहजाद शेख या नराधमाने दिवसाढवळ्या भरवस्तीत पाठलाग करून घरात शिरत एका हिंदु महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या पिडितेला न्याय देण्याऐवजी स्थानिक मुस्लिम नेत्यांनी पोलिसांवर दबाव टाकण्यासह पिडितेच्या कुटुंबियांना धमकावले होते.
अखेर, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याने पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून उशिरा आरोपीला अटक केली होती.मात्र, पोलीस कोठडी होण्याऐवजी आरोपीची तात्काळ जामिनावर मुक्तता झाल्याने सकल हिंदु समाज तसेच भारतीय स्त्री शक्ती, राष्ट्र सेविका समिती, हिंदू जागरण मंच, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी, शिव शंभू विचार मंच आदी संघटनानी शनिवारी ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी केली होती.
त्यानुसार, पोलिसांनी नराधम शहजाद शेख याचा समर्थक असलेला कथित नेता अफराक सिद्दीकी, इस्तियाक आणि अन्य एक जणाविरोधात भा.द.वि. २९५, २९५ ए, १५३ ए, ५०४, ५०६ आणि ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. मात्र,आरोपींना बड्या राजकिय नेत्याचे पाठबळ असल्याने अद्यापही हे जिहादी मोकाट असल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
जिहादींकडून मंदिराची विटंबना
२३ जून रोजी हिंदू महिलेच्या घरी शहजाद शेख या नराधमाकडून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी, स्वतःला वाचवण्यासाठी पिडीत महिलेने परिसरातील शिव मंदिरात आश्रय घेतला असता, १००-१५० मुस्लिम पादत्राणे घालुन मंदिरात घुसले आणि पीडित महिलेला बाहेर येण्यास धमकावले. मंदिराची विटंबना करणाऱ्या या जिहादींची तक्रार हिंदु संघटनांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
आज जेल, कल बेल फिर वही खेल - जिहादींचे फुत्कार
ठाण्याच्या हाजुरीतील हिंदू रहिवासी असुरक्षित बनले आहेत. जिहादीकडून हिंदूवर अत्याचार सुरू असुन धार्मिक भावनाही दुखावल्या जात आहेत. राजाश्रयाच्या नावाखाली अनेक महिन्यांपासून हे प्रकार सुरू असुन पोलीसही पक्षपातीपणे वागतात. हिंदु समाजाने आवाज उठवल्यानंतर पोलिसांकडून थातुरमातुर कारवाई झालीच तर " आज जेल, कल बेल ....फिर वही खेल शुरू करेंगे. असे फुत्कार हे जिहादी सोडतात.
- विजय त्रिपाठी, सकल हिंदु समाज