मुंबई : मुंबई लोकलवरील वाढत्या प्रवासी संख्या लक्षात घेता लोकलच्या फेऱ्या वाढविण्याच्या सूचना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या रेल्वे प्रशासनाला दिल्या आहेत. मुंबई लोकलने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. अशातच बऱ्याच वेळेस लोकलमधून पडून जीव गमावल्याच्या घटनाही समोर येतात. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वे बोर्डास सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, लोकलमधून प्रवास करणाऱ्या नोकरदारवर्गाला आता मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना मुंबईच्या लोकल फेऱ्यांत वाढ करण्यात यावी. तसेच, दैनंदिन फेऱ्या कशा वाढविण्यात येतील यावर काम करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. परिणामी, रेल्वे मंत्र्यांच्या निर्देशानंतर लवकरच लोकलच्या फेऱ्या वाढणार आहेत.