लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हे भारताचे नवे लष्करप्रमुख; जनरल मनोज पांडेंना देण्यात आला गार्ड ऑफ ऑनर

30 Jun 2024 15:41:39
 pandey
 
नवी दिल्ली : भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांना त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी औपचारिक निरोप देण्यात आला. जनरल पांडे यांनी भारतीय लष्करप्रमुख म्हणून २६ महिने देशाची सेवा केली. त्यांनी आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली.
 
जनरल मनोज पांडे यांच्या जागी लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हे भारताचे लष्कर प्रमुख पदभार स्वीकारतील. लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी भारतीय लष्कराचे ३० वे लष्करप्रमुख असतील. यापूर्वी त्यांनी उपलष्करी प्रमुख, नॉर्दर्न आर्मी कमांडर, डीजी इन्फंट्री आणि आर्मीमध्ये इतर अनेक पदांवर देशाची सेवा केली आहे.
  
३९ वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत त्यांनी काश्मीर खोऱ्यात तसेच राजस्थानमध्ये आपल्या युनिटचे नेतृत्व केले. त्यासोबतचं ईशान्य भारतातील दहशतवादविरोधी कारवाईत आसाम रायफल्सचे सेक्टर कमांडर आणि महानिरीक्षक म्हणून काम केले आहे. जनरल पांडे दि. ३० मे रोजी निवृत्त होणार होते. पण त्यांना लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सरकारने दि. ३० जूनपर्यंत सेवा देण्याची परवानगी देऊन अतिरिक्त महिन्याची मुदतवाढ दिली होती.
 
 
Powered By Sangraha 9.0