सलमान खान प्रकरणात आणखी एका आरोपीला हरियाणातून घेतले ताब्यात

03 Jun 2024 18:00:19
 
salman khan
 
 
मुंबई : अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. या पाचव्या आरोपीला हरियाणातून अटक करण्यात आली आहे. जॉनी वाल्मिकी असे आरोपीचे नाव असून त्याला बाहेरुन मदत करणाऱ्या आणखी आरोपींच्या शोधात सध्या पोलिस आहेत.
 
दरम्यान, सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या घरावर ४० गोळ्या झाडण्याच्या आरोपींना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, आरोपींनी ५ गोळ्याच फायर केल्या असून १७ राऊंड जप्त केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
 
तसेच, मुंबई पोलिसांच्या हाती या गोळीबार प्रकरणाबाबत महत्वाचा पुरावा लागला असून पोलिसांनी पकडलेल्या आरोपींपैकी अजय कश्यप आणि त्याच्या साथीदाराचे व्हिडीओ कॉलवर जे बोलणं झाले, त्याचा व्हिडीओ मिळाला आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीने रचलेल्या कटानुसार, ७० ते ८० जणं सलमान खानच्या पनवेल येथील फॉर्म हाऊसची रेकी करत होते. आणि हे सगळेच आरोपी सलमान खानच्या गाडीवर हल्ला करण्याच्या तयारीतही होते. याच प्रकरणी मुंबई पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली होती. यापैकी एकाने तुरुंगातच आत्महत्या केली होती. दिवसेंदिवस हे प्रकरण अधिकच गंभीर होत चालले असून या प्रकरणाला पोलिस अधिक तपास करत आहेत.
Powered By Sangraha 9.0