रिलायन्स, अदानी, एसबीआय आज शेअर बाजारात जोरात बाजार भांडवल लाखो कोटींने वाढले

03 Jun 2024 15:29:38

adani
 
 
मुंबई: रिलायन्स, एसबीआय, अदानी समुहाच्या शेअर्समध्ये आज नवा उच्चांक गाठला आहे. बाजारातील मोठ्या हालचालींमुळे बाजारात सकाळीच सेन्सेक्स निर्देशांक २११४ अंशाने वाढला तर निफ्टीतही ६५० हून अधिक पातळी गाठली गेली होती. परि णामी सगळ्याच लार्जकॅप शेअर्स मोठ्या संख्येने उसळले आहेत. त्यामध्ये विशेषत अदानी, अंबानी व एसबीआय समभागातही मोठी वाढ झाली आहे.
 
दुपारपर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीज समभागात (शेअर्समध्ये) ३०२५ किंमतीची नवीन पातळी गाठली गेली होती. यापूर्वी रिलायन्सचा समभाग मार्च महिन्यात ३०२४.९ पातळीवर पोहोचला होता. दुसरीकडे अदानी पोर्टस, अदानी एंटरप्राईज समभागात मोठी वाढ झाली आहे. अदानी पोर्टस समभाग सकाळी उघडताना १० टक्के अधिक पातळीवर उघडला गेला होता तर इतर अदानी सम भाग ३ ते १२ टक्क्यांनी आज दिवसभरात वाढले होते. परिणामी अदानी समुहाच्या समभागात वाढ झाल्याने बाजारात ३ लाख कोटींची उलाढाल झाली आहे. कंपनीच्या बाजार भांडवल २० लाख कोटींपर्यंत पोहोचले आहे. हिंडनबर्ग अहवालापूर्वीच्या काळात अदानी समुहाचे बाजार भांडवल २४ लाख कोटी होते.
 
अदानी समुहाच्या समभागात ५.२ टक्क्यांनी वाढ होतानाच अदानी पोर्टस मध्ये ८.८ टक्के, अदानी ग्रीन ९.२ टक्के, अदानी एनर्जी ९ टक्के,अदानी विल्मर ३.५ टक्के, अदानी पावर १२.४ टक्के, अदानी टोटल गॅस १० टक्के, अंबुजा ३.७ टक्के, एनडीटीव्ही ६% समभागात वाढ झाली आहे.
 
दुसरीकडे रिलायन्सच्या समभागात ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.एप्रिल मे मधील घसरणीनंतर पुन्हा रिलायन्स समभागात पुन्हा वापसी झाली आहे. याआधी फेब्रुवारी मार्च महिन्यात कंपनीच्या समभागात वाढ झाली आहे. यामुळे कंपनीच्या बाजार भांडवलात २० लाख कोटींपर्यंत वाढ झाली आहे. आज एसबीआय बाजार भांडवलात देखील मोठी वाढ झाल्याने बाजार भांडवल ८ लाख कोटीवर पोहोचले आहे.२०२४ मध्ये एसबीआय समभाग ४० टक्क्यांनी वाढले आहेत. आयसीआयसीआय बँक,एचडीएफसी नंतर बाजार भांडवलात एसबीआयचा क्रमांक लागतो. आज एसबीआय समभागात ९.४५ टक्क्यांनी वाढ होत ९०८.९५ पातळीवर समभाग पोहोचला आहे.
 
Powered By Sangraha 9.0