मुंबई : अभिनेता रितेश देशमुख लवकरच मराठी बिग बॉसच्या पर्वाचं सुत्रसंचलन करणार असल्यामुळे चर्चेत होताच. पण आता तो ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवण्यास सज्ज झाला आहे. रितेश देशमुखने ओटीटीवर पदार्पण केले असून 'पिल' या वेब सीरिजच्या माध्यमातून तो फार्मा उद्योगातील सत्य उघडकीस आणणार आहे. या सीरीजचा ट्रेलर लाँच नुकताच झाला.
'पिल' या वेब सीरिजमध्ये नफ्यासाठी लोकांचा जीव धोक्यात घालणारे फार्मा उद्योग, त्यांना मदत करणारी भ्रष्ट यंत्रणा यावर भाष्य करण्यात आले आहे. रितेश देशमुख या सीरिजमध्ये प्रकाश चौहान या अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. भारतातील फार्मास्युटिकल जगताविषयी अनेक रहस्य दडली आहेत. या रहस्यांच्या मूळाशी जाण्याचा प्रयत्न प्रकाश चौहान करताना दिसणार आहे.