नागपूर : बजेट समजत नाही म्हणणारे बजेटवर बोलू लागले आहेत, असा खोचक टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. शुक्रवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यच्या अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली होती. दरम्यान, बावनकुळेंनी आता त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
हे वाचलंत का? - विधानपरिषद सभापतिपदासाठी भाजप आग्रही; बावनकुळेंची माहिती
नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "मुख्यमंत्री असताना बजेट समजत नाही असे म्हणणारे उद्धव ठाकरे आता बजेटवर बोलू लागले आहेत. त्यांना बजेटचा मतितार्थ समजला असता तर त्यांनी बजेटवर अभ्यास करून प्रतिक्रिया दिली असती. चांगल्या बजेटला, कर्तव्यनिष्ठ सरकारला टोमणे मारायचे आणि विरोधासाठी विरोध करायचा. उद्धव ठाकरे यांना बजेटचा अभ्यास करणे शिकावे लागेल. महाराष्ट्रातील जनतेच्या विकासाकरिता महायुती सरकार काम करीत आहे," असे ते म्हणाले.