मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवार, दि. २८ जून २०२४ आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी अतंरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौरउर्जा पंप देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. त्यासोबतचं शेतीमाल ठेवण्यासाठी गाव तिथे गोदाम या योजनेची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे.
त्यासोबतचं कापूस आणि सोयाबीन पिकासाठी पाच हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्याची घोषणा महायुती सरकारने अर्थसंकल्पात केली आहे. गाव तिथे गोदाम या योजनेत पहिल्या टप्प्यात १०० नवीन गोदामांचे बांधकाम तसेच अस्तिवात असणाऱ्या गोदामांची डागडुजी करण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यासोबतचं तेलबियांच्या उत्पादकतेत वाढ व्हावी यासाठी सुरू असलेल्या विशेष कृती योजनेसाठी अर्थसंकल्पात ३४१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.