अमेरिकन नौदलातील 'मंटा रे' सॅटेलाईटवर; सोशल मीडियावर चर्चा!

27 Jun 2024 16:39:46
american navy manta ray drone


नवी दिल्ली :      अमेरिकन नौदलाचे 'मंटा रे' ड्रोन सॅटेलाईटवर दिसल्याने नवी चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, अमेरिकन सागरी ड्रोन कॅलिफोर्नियाच्या पोर्ट ह्युनेमे येथील नौदल तळावर दिसले होते. विशेष म्हणजे मंटा रे ड्रोनचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. काही तासानंतर त्याठिकाणी फक्त नौदलाच्या नौका पाहावयास मिळाल्या. एकंदरीत, सॅटेलाईटवरून दिसलेले ड्रोनचे फोटो पाहिल्यानंतर अमेरिकन नौदल मोठ्या मोहिमेच्या तयारीत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान, अमेरिकन नौदलाचे ड्रोन ‘मंटा रे’ हे प्रीडीएटर अंडरवॉटर ड्रोन विकसित केले आहे. कॅलिफोर्नियातील पोर्ट ह्युनेमे नौदल तळावर गुगल मॅप्सद्वारे डॉक केलेले यूएसचे टॉप-सिक्रेट पाणबुडी प्रोटोटाइप शस्त्र म्हणून 'मंटा रे' गणले जाते. ड्रोनची एक प्रतिमा व्हायरल झाल्यानंतर हटविली गेली. न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, नव्या तंत्रज्ञानाने विकसित असलेले स्वायत्त जहाजाचे त्याच्या उत्तम डिझाइन आणि कमी-पॉवर मोडमध्ये चालत असताना पाण्याखाली खोलवर नांगर टाकण्याची क्षमतेमुळे समुद्री प्राण्याचे नाव देण्यात आले आहे.

मंटा रेची निर्मिती यूएस नेव्ही प्रकल्पाचा एक भाग म्हणून नॉर्थरोप ग्रुमनने केली आहे. या प्रकल्पांतर्गत पाण्याखालील लांब पल्ल्याची शस्त्रे विकसित केली गेली आहेत. अत्याधुनिक अंडरवॉटर ड्रोन इंधन भरल्याशिवाय खूप दीर्घ कालावधीसाठी समुद्राच्या तळावर हायबरनेट करण्यास सक्षम असल्याचे म्हटले जाते.



Powered By Sangraha 9.0