मुंबई : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी दि. २६ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. पण मुंबई शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उबाठा सेनेने पैशाचा धुमाकूळ घातला. उबाठा गटाचे उमेदवार 'अभ्यंकर हे भयंकर' आणि 'परब हे अरब' असल्यासारखे त्यांचे लोक पैसे वाटप करत होते, अशी टीका भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी विधान भवनाच्या परिसरात केली.
शेलार पुढे म्हणाले, पैशाच्या जीवावर मतदारांना विकत घेता येते. ही मानसिकता ठेवून उबाठा सेनेने धुमाकुळ घातला. त्यांना अन्य उमेदवारांनी ही त्यांना साथ दिली. पण भाजपने किरण शेलार आणि शिवनाथ दराडे यांच्यामागे संघटनेची ताकद उभी होती. आमचा मतदारांवर विश्वास आहे. मतदार आमचा विजय स्विकार करतील, असा दावा शेलारांनी केला.